शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन फोर्ड अस्पायर सीएनजी पर्यायामध्ये लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 8:14 AM

1 / 4
फोर्ड कंपनीची Ford Aspire ही कॉम्पॅक्ट सेदान कार दोन महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आली होती. आता या कारमध्ये सीएनजी प्रणालीही बसविता येणार आहे. कंपनीने सीएनजी पर्याय देणारे दोन मॉडेल लाँच केले असून Ambiente आणि Trend Plus मध्ये सीएनजी किट मिळणार आहे.
2 / 4
Ford Aspire मध्ये 1.2 लिटर ड्रॅगन सिरिज इंजिन देण्यात आले आहे. यापूर्वीच्या इंजिनमध्ये सीएनजी पर्याय देण्य़ात आला नव्हता. मात्र, प्रदुषण टाळण्यासाठी कंपनीने सीएनजी पर्याय देण्यास सुरुवात केली आहे.
3 / 4
Ford Aspire CNG चे अॅम्बिएन्ट मॉडेलची किंमत 6.27 लाख रुपये एक्सशोरूम असणार आहे. हे मॉडेल खासकरून टॅक्सीचालकांसाठी असेल. तर Trend Plus हे सीएनजी मॉडेल खासगी वापरासाठी देण्यात येणार आहे.
4 / 4
Ford Aspire मध्ये या श्रेणीमध्ये पहिल्यांदाच सस्पेंशन टाईप सिलेंडर फिटमेंटची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे सामान ठेवण्यासाठी बूटस्पेस रिकामे राहणार आहे.
टॅग्स :Fordफोर्डPetrolपेट्रोल