शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 3:54 PM

1 / 8
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती सुरू झाली. देशात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची आहे. विशेष म्हणजे या स्कूटर्स Hero, Honda किंवा Bajaj सारख्या कंपन्या लॉन्च करत नाहीत तर Ola आणि Infinity सारख्या नवीन स्टार्टअप कंपन्या लॉन्च करत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि इलेक्ट्रिक स्कूटरच्या घटत्या किमतीमुळे लोकही त्यांना पसंती देत ​​आहेत.
2 / 8
ओलाच्या स्कूटरचे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच लाखावर स्कूटर बुक झाल्या. यावरून तुम्हाला लोकांच्या ट्रेंडची कल्पना येईल. कंपनीचा दावा आहे की त्यांना 1 लाखांहून अधिक वाहनांचे बुकिंग मिळाले आहे.
3 / 8
विशेष बाब म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमतही होंडा अ‍ॅक्टिव्हा सारख्या नामांकित पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटरएवढीच किंवा कमी आहे. एकीकडे देशात ईव्ही चार्जिंगची पायाभूत सुविधा मजबूत होत आहे.
4 / 8
अलीकडच्या काळात ज्या स्कूटरने सर्वाधिक लक्ष वेधले आहे, ती स्कूटरम्हणजे ओला एस१ आहे. दिल्लीत OLA S1 ची किंमत 85 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ते 121 किलोमीटरची ड्राइव्ह रेंज देते. याची बॅटरी 2.98KWh आहे, तिचा टॉप स्पीड 90km प्रति तास आहे, तो 3.6 सेकंदात 40km चा वेग गाठू शकतो.
5 / 8
बंगळुरूस्थित बाउन्स इन्फिनिटी ही कंपनी उदयास आली आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 68,999 रुपये आहे. यात 2kWh 48V बॅटरी आहे. यात तीन रायडिंग मोड आहेत - ड्रॅग मोड, इको मोड आणि पॉवर मोड. पॉवर मोडमध्ये त्याचा टॉप स्पीड 65kmph आहे. याशिवाय, ही स्कूटर इको मोडमध्ये सिंगल चार्जवर 85km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
6 / 8
हिरो ही दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेतील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीला ईलेक्ट्रीक स्कूटर बनविण्याचा दहावर्षांपासूनचा अनुभव आहे. सुरुवातीला सनीसारख्या स्कूटर ही कंपनी बनवायची. Hero Electric NYX HX ड्युअल बॅटरीसह येतो. त्याचा टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास आहे. यात 600 वॅटची मोटर आहे. बॅटरी एकदा चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. यात 51.2 व्होल्ट 30AH बॅटरी पॅक आहे. दिल्लीत त्याची किंमत 67540 रुपये आहे.
7 / 8
जर तुम्हाला स्कूटरसोडून ईलेक्ट्रीक बाईक घ्यायची असेल, तर इथेही 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. रिव्होल्ट आरव्ही 400 बाइक. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेली ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे
8 / 8
बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4.5 तास लागतात. त्याच वेळी, याचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. कंपनीने दावा केला आहे की 100 किलोमीटरसाठी या इलेक्ट्रिक बाइकला फक्त 9 रुपये खर्च येतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक बाईकची दिल्लीत किंमत (एक्स-शोरूम) 90,799 रुपये आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनHondaहोंडाOlaओला