शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईलमध्ये 'ही' अ‍ॅप ठेवा; वाहतूक नियमभंगाच्या दंडापासून सुटका मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:16 PM

1 / 8
वाहतुकीच्या सुधारित नियमांमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी असे जवळपास चार कागदपत्रे सतत बाळगावी लागतात. ही कागदपत्रे घरी विसरली आणि जर वाहतूक पोलिसांनी पकडले तर दंडाची पावती फाडावी लागते. पण सरकारने ही गैरसोय टाळण्यासाठी काही अ‍ॅप आणली आहेत.
2 / 8
जर तुमच्याकडे वाहन चालक परवाना, वाहनाचा परवाना नसेल तर मोठ्या रकमेची पावती फाडली जाऊ शकते. मात्र, तुम्ही स्मार्ट असाल तर यापासून वाचू शकता
3 / 8
केंद्र सरकारने DigiLocker आणि mParivahan अशी दोन अॅप आणली आहेत. ही अॅप गेल्या काही वर्षांपासून आहेत. बरेचजण त्यांचा वापरही करत आहेत. या अॅपद्वारे इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे दाखविल्यास वाहतूक पोलिसांना मान्य करावेच लागणार आहे. तसा आदेशही सरकारने काढला आहे.
4 / 8
डिजिलॉकरमध्ये कागदपत्रे साठविताना तुमची माहिती भरावी लागणार आहे. यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
5 / 8
व्हेरिफिकेशन झाल्यावर इन्शुरन्स कॉपी, लायसन, आरसी आदी कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करता येणार आहेत.
6 / 8
एम परिवाहनवर गाडीचा क्रमांक टाकल्यास वाहनाची माहिती येते. यानंतर आरसी, ड्रायव्हिंग लायसन सेव्ह करण्यासाठी रजिस्टर करावे लागणार आहे. लॉग इन केल्यावर ओटीपी येईल.
7 / 8
यानंतर MY RC सेक्शनला जाऊन गाडीचा नंबर टाकावा. नंतर पावती नंबर विचारला जाईल तो टाकल्यानंतर तुमच्या गाडीची आरसी दिसेल.
8 / 8
तसेच लायसन साठी My DL ला जाऊन ड्रायव्हिंग लायसनचा क्रमांक आणि जन्म तारीख टाकावी. ती सेव्ह करून ठेवावी. लायसन एक असते. मात्र, वाहने अनेक असतात. यामुळे प्रत्येक वाहनाची आरसी एकाच अॅपमध्ये सेव्ह करता येते.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस