mahindra and mahindra unveils new brand logo ahead of xuv700 launch what will change
Mahindra ने 21 वर्षांनंतर का बदलला आपला Logo? जाणून घ्या, या मागील उद्देश... By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 8:32 PM1 / 8महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra ) आपला नवा लोगो जारी केला आहे. हा लोगो पहिल्यांदा कंपनीच्या आगामी XUV700 गाडीवर दिसेल. नवीन लोगोसह कंपनी आणखी काय बदलणार आहे, या ब्रँड मेकओव्हरचा येथे काय अर्थ आहे, हे जाणून घ्या...2 / 8महिंद्रा अँड महिंद्राचा सध्याचा लोगो जो ‘Road Ahead' आहे, तो कंपनीने २००० साली लाँच केला होता. हा लोगो पहिल्यांदा २००२ मध्ये स्कॉर्पिओवर पाहिला होता. दरम्यान आता कंपनीचा लोगो २१ वर्षांनंतर बदलणार आहे.3 / 8नवीन लोगो केवळ स्पोर्ट युटिलिटी वाहनांसाठी म्हणजेच एसयूव्हीसाठी वापरला जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे जुने लोगो कंपनीच्या ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांवर असतील. असे असले तरी कंपनीच्या कार व्यवसायाला ही वेगळी इमेज असेल. लोगो दर्शवितो की कंपनीचे लक्ष एसयूव्ही बाजारावर आहे, ज्यासाठी कंपनी नवीन ब्रँड स्ट्रॅटर्जी स्वीकारत आहे.4 / 8महिंद्रा अँड महिंद्राची देशभरात ८३२ शहरांमध्ये आउटलेट आहेत. आता कंपनी आपल्या कार व्यवसायाचा लोगो बदलत आहे, त्यामुळे त्याच्या सर्व स्टोअर्स, डीलरशिपचाही मेकओव्हर होईल. अशा परिस्थितीत कंपनीने केवळ आपला लोगोच बदलला नाही तर या लोगोद्वारे आपल्या ब्रँड इमेजला रिफ्रेश लूकही देईल.5 / 8कंपनीचा ब्रँड फिल्म सुद्धा असे संकेत देत आहे की, त्यांचा संपूर्ण फोकस एसयूव्ही सेगमेंटवर आहे, तो सुद्धा ४ बाय ४ ड्राइव्ह मोडवर, कारण ब्रँड फिल्ममध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत महिंद्रा उभे असल्याचे दाखवले आहे.6 / 8महिंद्रा अँड महिंद्राचा नवीन लोगो ग्रे-मेटेलिक कलर आहे. हा बऱ्यापैकी प्रीमियम लूक देतो. एसयूव्ही सेगमेंटमधील महिंद्राची टक्कर Kia Motors, MG Motors, Hyundai Motors सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडशी आहे. 7 / 8महिंद्राने आपला नवीन लोगो सर्वात आधी महिंद्रा एक्सयूव्ही ७०० वर लाँच करणे देखील आपली प्रीमियम सेगमेंट रणनीती दर्शविते. कंपनीने आतापर्यंत उघड केलेल्या आपल्या कारच्या फीचर रिव्हिलनुसार, ती त्याच्या सेगमेंटमध्ये खूप प्रीमियम कार असेल.8 / 8प्रताप बोस नुकतेच महिंद्रामध्ये मुख्य डिझाइन अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. ते आधी टाटा मोटर्समध्ये होते. नवीन लोगोची डिझाइन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. प्रताप बोस म्हणाले की, नवीन लोगोमागील आयडिया लोकांना स्टाइल, कंट्रोल आणि सिक्योरिटीसोबत जिथे पाहिजे तेथे जाऊ शकतात, असे वाटणे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications