शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिंद्रा समूहाची मोठी कामगिरी; भारतीय सैन्यासाठी बनवली बॉम्बरोधक गाडी, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 8:31 PM

1 / 9
Mahindra Armado ALSV: भारतीय संरक्षण क्षेत्रात एक मोठी कामगिरी नोंदवण्यात आली आहे. देशातील सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने भारतीय लष्कराला 'आर्माडो'(Armado) सुपूर्द केले आहे. महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स (MDS) ने देशातील पहिले बॉम्बरोधक/चिलखती वाहन बनवले आहे.
2 / 9
महिंद्रा आर्माडो हे संपूर्णपणे भारतात बनवलेले पहिले आर्मर्ड वाहन आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आर्माडोची डिलिव्हरी सुरू केल्याची माहिती दिली. हे भारतीय सशस्त्र दलांसाठी विकसित केलेले आर्मर्ड लाइट स्पेशलिस्ट व्हेईकल (ALSV) आहे.
3 / 9
आनंद महिंद्रा यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बरोधक वाहनाची डिलिव्हरी सुरू केल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर आर्माडोचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, आर्माडो हे देशातील पहिले आर्मर्ड लाइट स्पेशलिस्ट वाहन आहे. ही भारतासाठी एक मोठी गौरवाची गोष्ट आहे.
4 / 9
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, Armado ला खास भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आले आहे. याच्या डिझाइनसह उत्पादनही भारतातच करण्यात आले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी या प्रोजेक्टशी संबंधित लोकांचे आभारही मानले.
5 / 9
यावेळी त्यांनी महिंद्रा डिफेन्सचे अध्यक्ष एसपी शुक्ला आणि प्रोजेक्ट लीडर सुखविंदर हेरे यांचे विशेष आभार मानले. संपूर्ण टीमने संयम, चिकाटी आणि जिद्दीतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्याचे ते म्हणाले.
6 / 9
हे पूर्णपणे स्वदेशी वाहन असून, यात 5 जणांसाठी बसण्याची जागा आहे. याशिवाय, हे वाहन 1000 किलो क्षमतेव्यतिरिक्त 400 किलो वजन स्वतंत्रपणे वाहून नेऊ शकते.
7 / 9
महिंद्राच्या या मॉड्युलर वाहनाचा वापर दहशतवादविरोधी कारवाया, खुल्या आणि वाळवंटी भागात छापे टाकणे किंवा सीमेवर गस्त घालणे, शस्त्रे वाहून नेणे इत्यादींसाठी होऊ शकतो. स्पेशल फोर्सेस आणि क्विक रिअॅक्शन टीम्सदेखील त्यांच्या मोहिमांसाठी वापर करू शकतात.
8 / 9
या वाहनात B7 लेव्हल आणि SATNAG लेव्हल 2 चे बॅलिस्टिक प्रोटेक्शन मिळते. म्हणजेच, ही गाडी आर्मर-पियर्सिंग रायफल्सपासून संरक्षण देते. याशिवाय, ASLV बॅलिस्टिक मिसाईल आणि बॉम्बपासूनही संरक्षण मिळते.
9 / 9
महिंद्राच्या या 4 व्हीलर गाडीत 3.2 लिटर मल्टी फ्यूल डिझेल इंजिन दिले आहे. याशिवाय, 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची सुविधा मिळते. ही गाडी 12 सेकंदात 0 ते 60 किलोमीटरचा वेग पकडू शकते.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMahindraमहिंद्राAutomobileवाहनcarकार