शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Bolero ९ सीटरचा जबरदस्त लूक, नवीन फिचर्स; किंमत तर Ertiga पेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 9:01 AM

1 / 10
जर आपल्याला मोठ्या कारबद्दल विचार करायचा झाला तर सर्वात आधी महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) हे भारतातील पसंतीच्या वाहनांपैकी एक मोठं नाव समोर येते. या कारच्या सर्व व्हेरियंटचे लोकांनी खूप कौतुक केले आहे.
2 / 10
आता महिंद्राने पुन्हा लोकांना वेड लावले आहे. होय, लवकरच महिंद्रा कंपनी बोलेरोचे एक नवीन मॉडेल घेऊन येत आहे, जे पाहून कोणीही क्षणात या कारच्या प्रेमात पडेल. महिंद्रा बोलेरोचे ९ सीटर मॉडेल येत आहे.
3 / 10
येत्या काही महिन्यांत महिंद्रा ही नवीकोरी कार लॉन्च करू शकते. जर तुम्हीही बोलेरोचे शौकीन असाल तर तुम्ही नक्कीच या नवीन कार मॉडेलच्या प्रेमात पडाल. बोलेरोच्या नवीन मॉडेलचा लूक कारप्रेमींना खूपच आकर्षिक करत आहे.
4 / 10
यात एकापेक्षा जास्त वैशिष्ट्ये आहेत. एवढेच नाही तर कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत हे मॉडेल खूप मोठे आहे. या मॉडेलमध्ये खूप छान वैशिष्ट्ये आहेत. जर आपण त्याच्या इंजिनबद्दल बोललो तर त्याचे इंजिन 1493 cc चे MHAWK75 BSVI बेस इंजिन आहे. हे सर्वात जबरदस्त कार इंजिन आहे.
5 / 10
बोलेरोच्या नवीन मॉडेलमध्ये खालील वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, एडजस्टेबल स्टीयरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, एअर क्वॉलिटी कंट्रोल, रिएर एसी व्हेंट्स, फ्रंट हिटेड सीट्स, हिटेड सीट्स रिएर, रिमोट ट्रंक ओपनर असे फिचर्स यात पाहायला मिळतात.
6 / 10
महिंद्रा बोलेरो २०२४ कारचे मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशनसह ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात पॉवर स्टीयरिंग, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. जे इतर वाहनांपेक्षा खूपच वेगळे आहे.
7 / 10
महिंद्रा बोलेरो मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १०.७९ लाख रुपये आहे, तुलनेने ही जास्त किंमत असूनही या मॉडेलची मागणी बाजारात जास्त असणार आहे. जर आपण महिंद्राच्या आधीच्या मॉडेल्सबद्दल बोललो तर त्यांची किंमत देखील खूप जास्त होती, परंतु तरीही ती खूप पसंत केली.
8 / 10
बोलेरो ही ग्रामीण जनतेची पहिली पसंती आहे. कारण त्या भागात गाडी चालवण्याची एक वेगळीच अनुभूती देते. मारुती बोलेरो ९ सीटर ढासू सेगमेंटमध्ये धमाकेदार एंट्री झालीय, नवीन फिचर्ससह उत्तम मायलेज देईल. या कारची किंमत Ertiga पेक्षा कमी आहे.
9 / 10
महिंद्रा ही देशातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे जी तिच्या SUV वाहनांसाठी ओळखली जाते. अत्यंत मर्यादित वैशिष्ट्यांसह आणि केवळ एक इंजिन पर्याय असलेल्या या एसयूव्हीची खेड्यापासून शहरांपर्यंत क्रेझ आहे.
10 / 10
महिंद्रा बोलेरो ही B2-सेगमेंट SUV आहे ज्यात ७ लोक बसू शकतात. महिंद्रा बोलेरो २०२२ ची एक्स-शोरूम किंमत ९.५३ लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत बेस व्हेरिएंट B4 ची आहे. तर टॉप व्हेरिएंट B6 OPT ची किंमत १०.४८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्रा