Mahindra Bolero Neo New Special Edition Launched, The Features Of The SUV Are Special
Mahindra Bolero Neo ची नवी स्पेशल एडिशन लॉन्च, जबरदस्त आहेत SUV चे फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:47 PM1 / 8महिंद्रा अँड महिंद्राने आपली बेस्ट सेलिंग एसयूव्ही Bolero Neo नवे लिमिटेड एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. अत्यंत आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या या लिमिटेड एडिशन बोलेरो निओची किंमत 11.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. 2 / 8खरे तर हिची किंमत रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत थोढी अधिकच आहे. मात्र, टॉप ट्रिम N10 वर बेस्ड असलेल्या या एसयूव्हीचे एक्सटीरिअर आणि इंटीरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. जे हिला आणखीनच सुंदर बनवतात.3 / 8Bolero Neo लिमिटेड एडिशनमध्ये काय आहे खास? - Bolero Neo लिमिटेड एडिशन मॉडेलच्या एक्सटीरिअरमध्ये कंपनीने, LED डे टाईम रनिंग लाइट्स, रूफ रेल, फॉग लेन्स आणि डीप सिल्व्हर शेडमध्ये स्पेअर व्हील कॅप सामील केले आहेत. हे बदल या एसयूव्हीच्या लुकला आणखीनच खास बनवतात. याशिवाय SUV च्या एक्सटीरिअरमध्ये इतर कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.4 / 8याच बरबोर या SUVच्या इंटिरिअरमध्येही कंपनीने काही विशेष फीचर्सचा समावेश केला आहे. हिच्या केबिनमध्ये 7 इंचाचे ट्चस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. जे ब्लूसेन्स कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी असलेले आहे. या फीचर्समध्ये रिव्हर्सिंग कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हील (माउंटेड कंट्रोलसह), सेंटर कंसोल आणि सिल्व्हर फिनिशसह आर्मरेस्ट देण्यात आले आहे.5 / 8टू-टोन फॉक्स लेदर सीट अपहोल्स्ट्री, फ्रंट आणि रिअरमध्ये आर्मरेस्ट आणि ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेन्जरसाठी लम्बर सपोर्ट आदी हिला आणखीनच खास बनवतात. 6 / 8इंजिन क्षमता आणि परफॉर्मन्स - कंपनीने या लिमिटेड एडिशनच्या इंजिन मॅकॅनिझममध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. या एसयूव्हीमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.5 लिटर क्षमतेचे mHawk 100 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 100 बीएचपीपेक्षा अधिक पॉवर आऊटपुट आणि 260 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्सने जोडण्यात आले आहे.7 / 8Mahindra Bolero Neo च्या टॉप व्हेरिअंटमध्ये कंपनी आधीपासूनच अनेक अॅडव्हॉन्स फीचर्स देते. यात डुअल फ्रंट एअरबॅग, इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), मल्टी इंफॉर्मेशन डिस्प्ले (MID) सारखे फीचर्स मिळतात. 8 / 8महिंद्रा निओच्या रेग्युलर मॉडेलची किंमत 9.48 लाख रुपयांपासून ते 11.99 लाख रुपयांपर्यंत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications