शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नव्या अवतारात येणार Mahindra Bolero, सीट्सही वाढवल्या जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:58 AM

1 / 7
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) लवकरच बोलेरो निओला (Bolero Neo) नवीन व्हर्जनमध्ये आणणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने TUV300 ला रिप्लेस करण्यासाठी नवीन बोलेरो निओ लॉन्च केली होती. आता कंपनी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नवीन बोलेरो महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus) या नावाने येईल आणि अनेक शानदार फीचर्सने सुसज्ज असणार आहे.
2 / 7
महिंद्रा बोलेरो निओ प्लस 2.2 (Mahindra Bolero Neo Plus 2.2) लीटर डिझेल इंजिनसह बाजारात येऊ शकते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. बोलेरो निओ प्लसचा आकार सँडर्ड निओपेक्षा मोठा असेल.
3 / 7
आगामी महिंद्रा बोलेरो निओ प्लस ही TUV300 Plus ची फेसलिफ्ट व्हर्जन असेल. बोलेरो निओ पल्समध्ये हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिल डिझाइन असेल. तसेच, नवीन बोलेरो क्लॅमशेल बोनेटसह येईल. आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी मॉडेल बोलेरा निओ प्लस मोठे असेल आणि ते 7 सीटर आणि 9 सीटर अशा दोन्ही व्हेरिएंट्ससह बाजारात येईल.
4 / 7
कॉम्पॅक्ट बोलेरो निओ प्रमाणे, बोलेरो निओ प्लसमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, पॉवर अॅडजस्टेबल ORVM, हाय अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इको मोडसह एसी आणि इतर अनेक शानदार फिचर्स मिळू शकतात.
5 / 7
बोलेरो निओ प्लसची इंटिरिअर डिझाइन सिंपल असेल. केबिनची डिझाइन आणि डॅशबोर्ड बोलेरो निओ प्रमाणेच असणार आहे. महिंद्रा बोलेरो निओ प्लसला सहा व्हेरिएंटमध्ये आणली जाऊ शकते. 7 सीटर बोलेरो निओ प्लस P4 मध्ये सादर केली जाईल आणि P10 मध्ये अनेक व्हेरिएंट्स येतील.
6 / 7
महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo) सध्या 5 व्हेरिएंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये N4, N8, N10R, N10 आणि N10 चा समावेश आहे. सध्याच्या निओ मॉडेलची किंमत 9.29 लाख ते 11.78 लाख रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, बोलेरो निओ प्लसच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 13 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
7 / 7
महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक स्कॉर्पिओ या महिन्यात एका नवीन शैलीत लॉन्च करणार आहे. नवीन स्कॉर्पिओ(New Scorpio-N) 27 जून रोजी बाजारात येणार आहे. रिपोर्टनुसार, या कारची किंमत 14 लाख ते 18 लाख रुपये (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobile Industryवाहन उद्योग