शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Cars Discount : या महिन्यात महिंद्राच्या कारवर मिळतेय मोठी सवलत, 3.5 लाखांपर्यंत करू शकता बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 1:04 PM

1 / 6
नवी दिल्ली : या नोव्हेंबर महिन्यात महिंद्र कंपनी आपल्या काही निवडक एसयूव्हीवर (SUV) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये एक्सयूव्ही 400 ईव्ही, एक्सयूव्ही 300 आणि बोलेरो निओ कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मराजो एपीव्ही आणि बोलेरो एसयूव्ही सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. ही सवलत ग्राहकांना रोख सवलत आणि अधिकृत अॅक्सेसरीजच्या स्वरूपात मिळणार आहे.
2 / 6
महिंद्राच्या एकमेव ऑल-इलेक्ट्रिक कारच्या टॉप-स्पेक ईएल व्हेरिएंटवर ग्राहक 3.5 लाखांपर्यंत आणि ईएससीसह ईएल व्हेरिएंटसाठी 3 लाखांपर्यंत आणि लो-स्पेक ईसी व्हेरिएंटवर 1.5 लाखांपर्यंत रोख सवलत मिळवू शकतात. यामधील ईएलमध्ये 39.4kWh बॅटरी (456 किमी रेंज) आणि 7.2kW चार्जिंग सपोर्ट आहे, तर ईसी व्हेरिएंट 34.5kWh बॅटरी पॅक (375 किमी रेंज) आणि 3.2kW चार्जर सपोर्टसह मिळते. महिंद्रा XUV400 च्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 150hp इलेक्ट्रिक मोटर आहे, जी फ्रंट व्हील ड्राइव्हला सपोर्ट करते.
3 / 6
महिंद्रा एक्सयूव्ही 300 वर या महिन्यात 1.2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मात्र, हा लाभ फक्त टॉप-स्पेक W8 व्हेरिएंटवर आहे. या सवलतीमध्ये 95,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे. या महिन्यादरम्यान W6 व्हेरिएंटवर 80,000 रुपयांपर्यंतचे लाभ मिळत आहेत, ज्यामध्ये 55,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 किमतीच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 300 मध्ये दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सेसच्या पर्यायाने सुसज्ज आहेत, तर 130hp पेट्रोल मॉडेलला मानक म्हणून मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.
4 / 6
या महिन्यात महिंद्राची एमपीव्ही 58,300 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 15,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजसह खरेदी करता येईल. हा लाभ मराजोच्या संपूर्ण रेंजमध्ये उपलब्ध आहेत. ही 7-सीटर एमपीव्ही 123hp, 1.5-लिटर डिझेल इंजिनसह येते आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सच्या पर्यायासह उपलब्ध आहे.
5 / 6
महिंद्रा बोलेरो नोव्हेंबरमध्ये 70,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. B4 ट्रिमला आपल्या स्टिकरच्या किमतीवर (रु. 20,000 किमतीच्या अॅक्सेसरीजसह) 50,000 रुपयांची सूट मिळत आहे, तर B6 आणि B6 पर्यायी ट्रिम अनुक्रमे 35,000 आणि 70,000 रुपयांच्या सवलतींसह ऑफर केली जात आहेत. बोलेरो ही एक विश्वासार्ह आणि हार्डी वर्कहॉर्स एसयूव्ही आहे, ज्यामध्ये 75hp, 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहेत. जी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
6 / 6
महिंद्राची बोलेरो निओ ही एक लॅडर-फ्रेम, रिअर-व्हील-ड्राइव्ह, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी 7-सीटर सीटिंग लेआउटसह येते. यामध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे 100hp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना टॉप-स्पेक N10 आणि N10 Opt व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, तर खालच्या N8 आणि N4 व्हेरिएंटवर अनुक्रमे 31,000 रुपये आणि 25,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या सवलतींमध्ये 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचाही समावेश आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहन