Mahindra company to step in electric car market; 5 year 'Mega Plan'
इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये महिंद्रा कंपनी ठेवणार पाऊल; ५ वर्षाचा 'मेगा प्लॅन' By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:46 PM1 / 10स्कोर्पिया-इननंतर (Scorpio N) महिंद्रा अँन्ड महिंद्रा भारतीय बाजारात आणखी काही नव्या एसयूवी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटी(Electric Vehicle) वर फोकस करण्याचा प्लॅन बनवला आहे. 2 / 10२०२७ पर्यंत महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनी देशात तब्बल ८ इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकतं. त्यात सर्वात आधी eXUV300 ही कार बाजारात येऊ शकते. कंपनी या कारला अपग्रेड करत XUV400 नावानं बाजारात उतरण्याच्या हालचाली करत आहे. 3 / 10सध्या महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणण्यासाठी सज्ज आहे. पुढील दोन महिन्यात कंपनी XUV 400 ही मार्केटमध्ये लॉन्च करू शकते. त्यानंतर काही महिन्यांनी Mahindra eKUV 100 ही कारही बाजारात आणण्याची शक्यता आहे. 4 / 10महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीने पहिल्यांदा २०२० मध्ये ऑटो एक्सपोमध्ये EKUV100 प्रदर्शनासाठी ठेवली होती. कंपनीने या कारची किंमत ८.२५ लाख रुपये असल्याची घोषणा केली होती. परंतु महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक कार अद्याप विक्रीसाठी सुरू झाली नाही. 5 / 10मागील ऑटो एक्सपोमध्ये महिंद्रा eKUV 100 ला १५.९ KWH बॅटरी पॅकसह लॉन्च केली होती. ही फ्रंन्ट एक्सल सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गाडी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५० किमी प्रवास सहजपणे पार करेल. 6 / 10कंपनीने सांगितले होते की, या कारची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सामान्य चार्जरने साडे पाच तास तर फास्ट चार्जरने ५५ मिनिटांचा कालावधी लागतो. कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार अपग्रेड करून बाजारात उतरवणार आहे. 7 / 10मागील २ वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये मोठे बदल झाले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्केटमध्ये अशा अनेक कार आल्या आहेत ज्या ऑटो एक्सपो २०२० मध्ये लॉन्च केलेल्या महिंद्रा eKUV 100 हून कित्येक पटीने चांगल्या आणि उत्तम आहेत. 8 / 10महिंद्रा कंपनीने पुढील काही महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ३ नवे पर्याय उपलब्ध करू शकतात. या कार बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जातील. अलीकडेच महिंद्राने फॉक्सवॅगनसह भागीदारीची घोषणा केली आहे. जेणेकरून ईवी तंत्रज्ञानाचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जाऊ शकतो. 9 / 10इलेक्ट्रिक वाहन उत्पादनासाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला ब्रिटीश इंटरनॅशनल इन्वेस्टमेंटकडून १ हजार ९२५ कोटी गुंतवणूक मिळाली आहे. भारतात इलेक्ट्रीकल्स वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. 10 / 10देशातील ईव्ही कारच्या वाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक सुविधा आणि प्रोग्राम लागू केले आहेत. त्यात, केंद्र सरकारने बॅटरी पॅकेजवर जीएसटी १८ टक्क्यांएवजी ५ टक्के एवढा कमी केला आहे. म्हणजेच, ईव्ही कार खरेदी करणाऱ्यांना १३ टक्के जीएसटी बचत होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications