शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिंद्राच्या 'या' गाड्यांवर मिळतेय भरघोस सूट; काय आहेत ऑफर? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:20 PM

1 / 6
भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) निवडक डीलरशिपवर थार 4x4, बोलेरो, बोलेरो निओ, मराझो आणि एक्सयूव्ही 300 वर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रोख सवलत आणि मोफत अॅक्सेसरीजचा लाभ मिळेल. मात्र, ग्राहकांना थार RWD, XUV700, Scorpio N, Scorpio Classic, XUV400 आणि बोलेरो व XUV300 च्या काही व्हेरिएंटवर कोणतीही सूट मिळणार नाही.
2 / 6
महिंद्रा बोलेरोवर या जुलैमध्ये 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कारच्या B4 ट्रिमवर 37,000 रुपये, B6 ट्रिमवर 25,000 रुपये आणि B6 ऑप्शनल ट्रिमवर 60,000 रुपयांची सूट आहे. बोलेरोला 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 75hp पॉवर जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
3 / 6
महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 वर या महिन्यात 55,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या एसयूव्हीच्या T-GDi व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे आणि इतर सर्व व्हेरिएंटवर 5,000-52,000 रुपयांच्या दरम्यान ऑफर मिळत आहेत. XUV300 च्या डिझेल व्हेरिएंटवर 20,000-55,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
4 / 6
या महिन्यात महिंद्रा बोलेरो निओवर 50,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या ऑफर्स मिळत आहेत. ग्राहकांना N4 व्हेरिएंटवर 22,000 रुपये, N8 व्हेरिएंटवर 31,000 रुपये, N10 R आणि N10 ऑप्शनलवर 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 100hp पॉवर जनरेट करते.
5 / 6
महिंद्रा थारच्या 4x4 व्हर्जनवर पेट्रोल आणि डिझेल इंजिनवर 30,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. हे दोन AX(O) आणि LX ट्रिममध्ये उपलब्ध आहे. थार 4X4 ला 2.0-लीटर पेट्रोल इंजिन (152hp/300Nm) आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन (130hp/300Nm) चा ऑप्शन मिळतो. दोन्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
6 / 6
या महिन्यात महिंद्रा मराझोवर 73,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कारच्या बेस मॉडेल M2 वर 58,000 रुपयांची सूट, मिड-स्पेक M4+ वर 36,000 रुपये आणि टॉप-स्पेक M6+ वर 73,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. महिंद्रा मराझोला 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळते, जे 123 hp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग