शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Electric SUV: खुशखबर! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार महिंद्राची इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 5:54 PM

1 / 8
नवी दिल्ली: दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रीक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. जवळपास सर्व कंपन्या आता इलेक्ट्रीक वाहनांच्या शर्यतीत उतरल्या आहेत. यातच आता महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रीक गाड्यांची सीरिज लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
2 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV रेंज सादर करणार आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक गाडी लॉन्च होणार आहे. या संदर्भात कंपनीने घोषणा केली आहे.
3 / 8
कंपनीने यासाठी युनायटेड किंगडम येथील ऑक्सफर्डशायरमधील डिझाइन स्टुडिओमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. महिंद्रा गेल्या काही काळापासून स्वातंत्र्यदिनीच आपले नवीन वाहन लॉन्च करत आले आहे.
4 / 8
यापूर्वी 15 ऑगस्ट 2020 रोजी महिंद्राने नवीन थार सादर केली होती. तर, XUV700 ची विक्रीही 14 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली होती. लॉन्च झाल्यापासून या दोन्ही वाहनांची प्रचंड विक्री झाली आहे.
5 / 8
म्हणूनच आता महिंद्रा 15 ऑगस्ट रोजी आपले पहिले इलेक्ट्रीक वाहन लॉन्च करणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येच महिंद्राने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक SUV लाइन-अपच्या तीन SUV चा पहिला टीझर रिलीज केला होता.
6 / 8
या तीन गाड्यांच्या फीचर्सची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. याला सी-आकाराचे एलईडी लाईट देण्यात आले आहेत. तसेच, SUV वर शार्प डिझाइन आणि अँगल आहेत. वाहनाच्या मागील भागावरील लाईटींग डिटेल्स टेललाइट्सपर्यंत आहेत.
7 / 8
आतील भागात रोटरी डायलसह इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्फोटेनमेंट ड्युटीसाठी ड्युअल स्क्रीन सेटअप देखील देण्यात आला आहे. या गाड्या त्यांच्या पेट्रोल-डिझेल मॉडेल्सपेक्षा वेगळे असतील.
8 / 8
या नवीन गाड्या कॉम्पॅक्ट SUV इलेक्ट्रिक आहेत. त्यामुळेच या पेट्रोल किंवा डिझेल मॉडेलपेक्षा वेगळे असतील. या गाड्या पूर्णपणे नवीन अवतारात सादर केल्या जातील. मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्या आगामी ऑटो एक्सपो 2023 मध्ये दाखवल्या जाऊ शकतात.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार