शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra EV: सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज, लवकरच लॉन्च होणार महिंद्राची इलेक्ट्रिक XUV300

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 3:20 PM

1 / 8
सध्या सर्वत्र इलेक्ट्रीक वाहनांची चर्चा सुरू आहे. जवळपास सर्वच कंपन्या इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत. पण, एका दशकापूर्वीच महिंद्राने या इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री घेतली होती.
2 / 8
ज्यावेळी इलेक्ट्रीक वाहनांची चर्चाही नव्हती, तेव्हा महिंद्राने e20 ही इलेक्ट्रीक गाडी मार्केटमध्ये उतरवली होती. पण, तेव्हा महिंद्राला इलेक्ट्रीक वाहनांची मागणी नसल्यामुळे महिंद्राला यात मोठे यश मिळाले नाही.
3 / 8
तेव्हापासून आजपर्यंत महिंद्राला या सेगमेंटमध्ये मोठे यश मिळवता आले नाही. याउलट टाटा मोटर्स, ह्यून्डाई इंडिया आणि एमजी मोटर इंडियाने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये आपल्या गाड्या लॉन्च केल्या.
4 / 8
पण, आता महिंद्रा या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये पुन्हा मोठी मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाले आहे. महिंद्राची लोकप्रिय कार असलेली XUV300 आता नवीन इलेक्ट्रीक अवतारात येणार आहे.
5 / 8
महिंद्राने बॅटरीवर चालणारी ई-व्हेरिटो सेडान लॉन्च केली. या कारला भारतात चांगली पसंती मिळाली आणि सध्या महिंद्राची ही एकमेव इलेक्ट्रीक कार बाजारात उफलब्ध आहे.
6 / 8
मागील ऑटो एक्सपोमध्ये महिंद्राने XUV300 EV च्या प्रोडक्शनापूर्वी तयार केलेल्या EVमॉडेलला सर्वांसमोर आणले होते. कंपनी या नवीन XUV300 इलेक्ट्रिकला 2023 पर्यंत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते.
7 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, XUV300 इलेक्ट्रिक SUV मध्ये 40 किलोवाट-आर बॅटरी पॅक मिळेल, जो 130 बीएचपी शक्ती जनरेट करतो आणि एका चार्जमध्ये 300 किमीची रेंज देऊ शकतो.
8 / 8
नुकताच याचा एक टेस्ट मॉडेल समोर आले होते. ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर याची थेट टक्कर टाटा नेक्सॉन EV, ह्यून्डाईच्या आगामी कार आणि MG च्या स्वस्त इलेक्ट्रिक कारसोबत असेल
टॅग्स :Mahindraमहिंद्राElectric Carइलेक्ट्रिक कार