महिंद्राच्या बहुचर्चित 5-डोअर Thar चे उत्पादन सुरू; कधी लॉन्च होणार? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 18:17 IST
1 / 7 Mahindra Five-door Thar : देशात लवकरच महिंद्रा 5-डोअर THAR लॉन्च होणार आहे. महिंद्रा THAR चे चाहते अनेक दिवसांपासून या SUV ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही थार आर्मडा (Thar Armada) नावाने भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, महिंद्राच्या चाकण येथील प्लांटमध्ये या कारचे उत्पादनही सुरू झाले आहे.2 / 7 5-डोअर THARसाठी ग्राहकांमध्ये असलेली उत्सुकता पाहून कंपनीने या एसयूव्हीची उत्पादन क्षमता वाढवली आहे. कंपनीने याआधी दर महिन्याला 2500 युनिट्सच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते, जेणेकरून वर्षाला 30,000 युनिट तयार केल्या जाऊ शकतात.3 / 7 पण आता कंपनीने आपले लक्ष्य दुप्पट केले आहे. आता महिंद्रा दर महिन्याला 5000 ते 6000 युनिट्सचे उत्पादन करणार आहे, ज्यामुळे एका वर्षात 5-डोअर थारच्या सुमारे 70000 युनिट्सचे उत्पादन होईल.4 / 7 महिंद्रा 5-डोअर थार, ही 3-डोअर थारचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या कारला मोठा व्हील बेस आणि जास्त कॅबिन स्पेस मिळेल. याशिवाय, कारमध्ये सामान ठेवण्यासाठी अधिक जागा असेल. सध्याच्या 3-डोअर थारमध्ये फारशी जागा मिळत नाही. 5 / 7 5-डोअर थारमध्ये अनेक पॉवरट्रेन पर्याय मिळतील, ज्यामुळे ही कार विविध किंमतीत उपलब्ध होईल. या थारच्या एंट्री-लेव्हल मॉडेलमध्ये RWD 1.5-लिटर डिझेल ते 4WD सह 2.2-लिटर डिझेलपर्यंतचे पर्याय मिळू शकतात. 6 / 7 नवीन थारमध्ये सुरक्षेचा विचार करुन नवीन फीचर्सही जोडण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या नवीन थारमध्ये मल्टिपल एअरबॅग्ज मिळतील. याशिवाय, लेव्हल 2 ADAS असेल. तसेच, या कारमध्ये तुम्हाला इन्फोटेनमेंट स्क्रीनचा पर्यायही मिळू शकतो.7 / 7 महिंद्राची मोस्ट अवेटेड 5-डोअर थार यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लॉन्च केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे, महिंद्राने याआधी 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या अनेक महत्त्वाच्या कार लॉन्च केल्या आहेत.