शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Scorpio-N: लॉन्चिंगपूर्वी लीक झाले नवीन Mahindra Scorpio N चे फीचर्स, 27 जूनला होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 3:31 PM

1 / 9
2022 Mahindra Scorpio-N Launch Date: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) ची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियोची क्रेझ अजूनही कायम आहे. आता कंपनी या स्कॉर्पियोचे नेक्स्ट जनरेशन मॉडल स्कॉर्पियो एन (2022 Mahindra Scorpio-N) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
2 / 9
महिंद्रा अँड महिंद्राकडून या नवीन स्कॉर्पियो एनला 27 जून रोजी भारतीय बाजारात उतरवले जाईल. कंपनीने या नवीन महिंद्रा स्कॉर्पियो एन गाडीत अनेक अॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत. कंपनीने स्पष्ट केलंय की, ही नवीन स्कॉर्पियो लॉन्च झाल्यानंतरही सध्या उपलब्ध असलेल्या स्कॉर्पियोची विक्री Scorpio Classic म्हणून सुरुच असेल.
3 / 9
Mahindra Scorpio ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या नवीन स्कॉर्पियोच्या लॉन्चिंगची तारीख सांगितली आहे. कंपनीने नवीन गाडीचा एक टीझर शेअर करत लिहीले की, फक्त नावच पुरेसे आहे(The name is enough). कंपनीने या नवीन स्कॉर्पियोला एसयूव्हींचा बाप म्हटले आहे. तसेच, हॅशटॅग #BigDaddyOfSUVs लिहीले.
4 / 9
या नवीन स्कॉर्पियो-एनची किंमत 10 लाख रुपयांपासून असेल. याची थेट टक्कर हुंडई क्रेटा, स्कोडा कुशाक, एमजी एस्टर, निसान किक्स, किआ सेल्टोस आणि फोक्सवॅगन टायगनसारख्या कॉम्पेक्ट एसयूव्हीसोबत असेल.
5 / 9
ऑल न्यू स्कॉर्पियो-एनच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसत आहे की, ही नवीन एसयूव्ही एक मस्कुलर सिक्स-स्लॅट क्रोम अॅम्बेलिश्ड ग्रिल आणि नवीन ‘ट्विन पीक्स’ लोगोसह बाजारात लॉन्च होईल. यात सी-शेप एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलँप आणि फॉग लँप दिलेला असेल.
6 / 9
ऑटो एक्सपर्ट सांगतात की, 2022 महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूव्हीमध्ये थार आणि एक्सयूवी 700 सारखे 2.0-लीटर डिझेल आणि 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. डिझेल इंजिनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 130 पीएस आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 160 पीएसची पॉवर जनरेट करण्याची क्षमता असेल.
7 / 9
याच्या टर्बो पेट्रोल इंजिनचे सर्व व्हेरिएंट 170 पीएसची पॉवर जनरेट करतील. हे इंजिन ऑफ-रोडर थारपेक्षा 20 पीएस आणि एक्सयूव्ही 700 पेक्षा 30 पीएस ज्यास्त पॉवर जनरेट करेल.
8 / 9
नवीन महिंद्रा स्कॉर्पियो-एनचे एक्सटीरियर आणि इंटीरियर डिझाइन अतिशय स्टायलिश असेल. यात फुल एलईडी लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ, ड्यूल झोन क्लाइमेट कंट्रोल, 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट, सर्व सीटला एअरबॅग आणि 360 डिग्री कॅमरा इत्यादी फीचर्स असतील.
9 / 9
ही एसयूवी कार 6-सीटर आणि 7-सीटर ऑप्शनमध्ये येईल. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्राने नवीन स्कॉर्पियोचा एक व्हिडिओ ट्विटर केला आहे. यात त्यांनी या गाडीला बंद पिंजऱ्यातील प्राणी म्हटले. ते म्हणाले की, हा जनावर पिंजऱ्यातून बाहेर येणार आहे. यात त्यांना काही लोकांनी एन चा अर्थ विचारला. याचा अर्थ New किंवा Neo असू शकतो.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन