शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Scorpio पासून XUV500 सारख्या गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट; २.५ लाखांपर्यंत होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 9:48 AM

1 / 10
सध्या ऑगस्ट महिन्यात अनेक कार कंपन्या आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर करत आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स अशा अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी या महिन्यात आपल्या कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 10
देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra And Mahindra) काही डीलरशिपवर या ऑगस्टमध्ये भारी सवलत देण्यात येत आहे.
3 / 10
कंपनीच्या निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहक लाखो रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. या ऑफरमध्ये महिंद्रा स्कॉर्पियोपासून (Mahindra Scorpio) XUV500 पर्यंत सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या वाहनांवर किती सूट दिली जात आहे.
4 / 10
या महिंद्रा वाहनांवर कॅश डिस्काऊंट सोबतच एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काऊंट, कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेसरीज सारख्या ऑफर दिल्या जात आहेत.
5 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, XUV500 च्या खरेदीवर ग्राहक 1.79 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, 50,000 रुपये एक्सचेंज बोनस, 6,500 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज घेऊ शकतात.
6 / 10
दुसरीकडे, स्कॉर्पियोवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4,500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 17,000 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.
7 / 10
याशिवाय, कंपनीच्या प्रीमियम MPV महिंद्रा मराझोवर 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,200 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश आहे.
8 / 10
या व्यतिरिक्त, XUV300 वर 10,480 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, 25,000 रुपये एक्सचेंज बोनस, 4,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 5,000 रुपये किंमतीच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.
9 / 10
कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीपैकी एक असेल्या Mahindra Bolero वर 3,500 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे.
10 / 10
याशिवाय चौथ्या वर्षाची कॉम्प्लिमेंटरी वॉरंटी ऑफर केली जात आहे. टीप: यामध्ये देण्यात आलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या डीलरशी संपर्क साधावा.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा