शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra XUV 700 खरेदीचा विचार करताय? जरा थांबा! एकदा 'ही' माहिती जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 1:43 PM

1 / 8
Mahindra नं आपल्या नव्या आकर्षक लोगोसह XUV 700 बाजारात दाखल केली आणि या नव्या कारनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लॉंच होताच कारला विक्रमी बुकिंग देखील मिळालं. या कारच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावता येईल की कार बुकिंगचा वेटिंग पीरियड तीन महिन्यांपासून एका वर्षापर्यंत इतका आहे.
2 / 8
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या XUV 700 चा बॅकलॉग तब्बल ७८००० यूनिट्सपर्यंत पोहोचला आहे असं Mahindra कंपनीचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे दर महिन्याला तब्बल १० हजार XUV 700 कारचं बुकिंग होत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या कालावधीसाठी कारची वाट पाहावी लागत आहे.
3 / 8
महिंद्रा XUV 700 नं बाजारात चांगलाच जम बसवला आहे. कार लॉंच झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १.७ लाख युनिट्स रजिस्ट्रेशन झाल आहे. या कारच्या पेट्रोल व्हर्जन MX सर्वात कमी म्हणजेच तीन महिन्यांचा वेटिंग कालावधी आहे. तर डिझेल व्हर्जन AX7 चा वेटिंग कालावधी तब्बल एक वर्ष इतका पोहोचला आहे.
4 / 8
याचा अर्थ असा की तुम्ही Mahindra XUV 700 डिझेल AX7 एकदा बुक केली की ती तुमच्या हातात येण्यासाठी तुम्हाला तब्बल १ वर्ष वाट पाहावी लागेल. महिंद्रांचे एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर राजेश जेजुरीकर यांच्या म्हणण्यानुसार १८ ते २४ महिन्यांच्या वेटिंगनंतरही १० ते १२ टक्के बुकिंग कॅन्सल होत आहेत.
5 / 8
ऑटोमॅटीक व्हेरिअंट XUV700 AX5 पेट्रोल ऑटोमॅटीकची डिलिव्हरी जवळपास सहा महिन्यांनी मिळत आहे. यानंतर AX5 डिझेल व्हेरिअंटचा नंबर लागतो. बहुतांश जागी AX5 डिझेल व्हेरिअंट मॉडलचा वेटिंग कालावधी जवळपास ८ महिन्यांच्या जवळपास आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल व्हेरिअंटचा वेटिंग कालावधी अधिक आहे.
6 / 8
XUV700 MX पेट्रोल व्हेरिअंटचा वेटिंग कालावधी तीन ते चार महिने इतका आहे. तर डिझेल व्हेरिअंटचा कालावधी सहा महिने इतका आहे. XUV700 MX एसयूव्हीचे डिझेल व्हेरिअंट 155hp च्या दमदार 2.2 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. तर याचं पेट्रोल व्हेरिअंट 200hp च्या क्षमतेसह २.० लीटर टर्बोचार्ज्ड पावरप्लांट इंजिनसह उपलब्ध आहे.
7 / 8
मॅन्युअल गिअरबॉक्सच्या XUV700 AX7 पेट्रोल व्हेरिअंटचा डिलिव्हरी कालावधी जवळपास सहा महिने इतका आहे. तर डिझेल व्हेरिअंटचा कालावधी जवळपास ८ महिने इतका आहे.
8 / 8
टॉप मॉडल XUV700 AX7 L बाबत बोलायचं झालं तर बाजारात या कारची मोठी मागणी आहे. याच्या पेट्रोल व्हेरिअंटसाठी ग्राहकांना ८ महिने थांबावं लागत आहे तर डिझेल व्हेरिअंटसाठी जवळपास १० महिने वाट पाहावी लागत आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन