Mahindra चा धमाका! ‘या’ कारचे बुकिंग १ लाखांच्या पार; १.५ वर्षांचे वेटिंग, तुम्हीही घेतलीय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:42 IST
1 / 9भारतीय बाजारांमध्ये आताच्या घडीला स्वदेशी कार निर्माता कंपन्यांनी धमाकेदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे Mahindra & Mahindra कंपनी. गेल्या अनेक महिन्यांपासून महिंद्रा अँड महिंद्रा अनेक कंपन्यांना मागे टाकत पुढे जात आहे.2 / 9सेमीकंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे कारची डिलिव्हरी आणि उत्पादन यांना फटका बसला आहे. ग्राहकांनी बुक केलेल्या कारची डिलिव्हरी देणे कंपन्यांना शक्य होत नाहीए. त्यामुळे वेटिंग पीरियड वाढत चालला आहे. याचा सर्वाधिक फटका महिंद्रा कंपनीला बसत असल्याचे बोलले जात आहे.3 / 9महिंद्राची लेटेस्ट SUV XUV700 ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद देण्यात येत आहे. महिंद्राने गतवर्षी ७ ऑक्टोबर २०२१ पासून या कारची बुकिंग सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ४ महिन्यात या कारला १ लाखांहून जास्त बुकिंग मिळाली आहे. 4 / 9Mahindra XUV700 या कारची जानेवारी २०२२ पर्यंत १४ हजारांहून जास्त यूनिट्सची डिलिव्हरी केली आहे. या कारच्या सर्व व्हेरियंट्ससाठी खूप मोठा वेटिंग पीरियड आहे. परंतु, टॉप स्पेक AX7 लग्झरी व्हेरियंटचा वेटिंग पीरियड १८ महिने वाढला आहे. 5 / 9Mahindra XUV700 डिमांडसोबत सेमी कंडक्टर चीपचे शॉर्टेज याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या एसयूव्हीमध्ये नवीन ब्लॅक ग्रीलसोबत मोठी व्हर्टिकल क्रोम स्लेट्स आणि फ्रंट वर नवीन लोगो दिला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प्स सोबत एलईडी डीआरएल, मोठी ट्विन सी शेप्ड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स दिली गेली आहे.6 / 9Mahindra SUV XUV700 मध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प्स सोबत एलईडी डीआरएल, मोठी ट्विन सी शेप्ड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स दिली गेली आहे. यात नवीन फ्लश - फिटिंग डोर हँडल्स, इलेक्ट्रिक वरून चालणाऱ्या ORVMs सोबत इंटिग्रेटेड टर्न सिग्नल्स आणि फ्लेयर्ड व्हील आर्क्स दिले आहे. याच्या रियरमध्ये स्टायलिश रॅपअराउंड एलईडी टेललॅम्प्स सोबत टेलगेट दिले आहे.7 / 9दरम्यान, महिंद्रा आता भारतात आपले पोर्टफोलियो सुद्धा वाढवण्याची तयारी करीत आहे. कंपनीने नुकतेच ३ इलेक्ट्रिक कारला टीज केले आहे. ज्याला जुलै २०२२ मध्ये पडदा उठवला जावू शकतो. महिंद्राची अद्यापही एकही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच झालेली नाही. 8 / 9महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी फेब्रुवारी महिन्यात काही कारवर भरघोस सूट देत आहे. कंपनीने या महिन्यासाठी निवडक मॉडेल्सवर ८१ हजार ५०० रुपयांतची सूट दिली आहे. मात्र यात एस्कयूव्ही ७००, थार किंवा बोलेरो निओ एसयूव्ही सारख्या फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश नाही.9 / 9महिंद्रा अँड महिंद्रा सर्वात मोठी सवलत त्यांच्या लाइनअपमधील सर्वात महागड्या एसयूव्हीवर ऑफर करत आहे. Alturas G4 एसयूव्हीवर फेब्रुवारीमध्ये ८१,५०० रुपयांपर्यंत ऑफर करत आहे. यासह XUV300, KUV100 NXT या कारवरही भरघोस ऑफर देत आहे.