शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त फीचर्ससह येतेय Force Gurkha SUV; कंपनीनं दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 4:32 PM

1 / 8
Force Motors ची ऑफ-रोडिंग एसयूव्ही Force Gurkha ची अनेक जण प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, ही कार आता लवकरच लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व नवीन Force Gurkha 4X4 ची झलक दाखवली आहे.
2 / 8
सणासुदीचा विचार करता पुढील महिन्यात ही एसयूव्ही बाजारात येऊ शकते अशी अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे. परंतु कंपनीनं या कारची लाँच डेट अधिकृतरित्या अद्याप जाहीर केलेली नाही.
3 / 8
2021 मध्ये ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा ही कार प्रदर्शित करण्यात आली होता. Gurkha 4X4 अर्थातच ऑफ-रोडर असेल आणि ही कार या सेगमेंटमध्ये महिंद्रा थारशी स्पर्धा करणार आहे.
4 / 8
कंपनी नवी Gurkha 3 डोअर आणि 5 डोअर व्हर्जनमध्ये लाँच करू शकते. 2021 Gurkha मध्ये एलईडी डीआरएलसह हेडलाइट्स, नवीन ग्रिल आणि फ्रंट बम्पर, स्नोर्कल, फ्रंट फेंडर्सवरील टर्न इंडिकेटर्स, नवे डिझाइन केलेले टेललाइट्स, नवे डिझाइन केलेले व्हील आणि टेलगेट-माऊंट स्पेअर व्हील यासारखे अनेक डिझाइन अपग्रेड दिसतील.
5 / 8
ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेले मॉडेल बऱ्यापैकी निराळे होते. प्रोडक्शन व्हर्जन हे त्याच्यासह किती सिमिलर असेल हे आता पाहावं लागेल. इंटिरिअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नेक्स्ट जनरेशन Force Gurkha दुसऱ्या रोमध्ये कॅप्टन सिट्स आणि मागील बाजूस साईड फेसिंग जंप सीट्स मिळण्याची शक्यता आहे.
6 / 8
केबिनला ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड, नवीन टचस्क्रीन सिस्टम, ब्लॅक साराऊंडसह गोलाकार एअर व्हेंट्स आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळू शकते. Force Gurkha मध्ये ए-पिलर माऊंटेड ग्रॅब रेल, स्क्वेअर शेप्ड आणि ग्लोव्ह-बॉक्स सारखी इतर वैशिष्ट्ये देखील दिली जाऊ शकतात.
7 / 8
2021 Force Gurkha च्या इंजिनबद्दल सांगायचं झालं तर BS6- अनुरूप 2.6-लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते. इंजिन जास्तीत जास्त 89 बीएचपी आणि 260 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.
8 / 8
अॅडव्हेच्नर्सच्या शौकीनांसाठी यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टमही देण्यात येईल. त्याशिवाय मुख्य फीचरमध्ये याच्या इंडिपेडेंट फ्रंट सस्पेन्शन आणि मागिल बाजूला Rigid axle चा समावेश असेल.
टॅग्स :carकारMahindraमहिंद्राForceफोर्सIndiaभारत