Mahindra XUV400: Mahindra to give to Tata; The XUV400 will launch in September, find out the details
Mahindra XUV400: महिंद्रा देणार टाटाला टक्कर; सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार इलेक्ट्रीक XUV400, जाणून घ्या डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 9:18 PM1 / 8 भारतीय कार निर्माता Mahindra (महिंद्रा) आपल्या अपकमिंग XUV400ने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार एंट्री करण्यास सज्ज झाली आहे. Mahindra XUV400 येत्या सप्टेंबर महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. 2 / 8 या गाडीची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारी-मार्चपर्यंत सुरू होईल. यापूर्वी Mahindraने e20 (महिंद्रा ई20) इलेक्ट्रिक हॅचबॅक बाजारात आणली होती, पण विक्री न झाल्यामुळे 2019 मध्ये मॉडेल बंद करण्यात आले.3 / 8 सध्या टाटा मोटर्स आपल्या Tata Nexon (टाटा नेक्सन) आणि Tata Nexon Max (टाटा नेक्सन मॅक्स) सारख्या कारसह इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हीकल (पीव्ही) सेगमेंटमध्ये सर्वात पुढे आहे. महिंद्राने आपल्या सब्सिडरी 'ईव्ही कंपनी'अंतर्गत XUV400 EV ला आणण्याची घोषणा केली आहे. 4 / 8 यूके स्थित डेव्हलपमेंट फायनांस इंस्टीट्यूशन आणि ब्रिटिश इंटरनेशनल इन्वेस्टमेंट (BII)ने महिंद्राच्या व्हेंचरमध्ये 1,925 कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. ही कंपनी प्रामुख्याने भारतीय ईव्ही मार्केटवर लक्ष केंद्रि त करेल.5 / 8 सध्या टाटा मोटर्स आपल्या टाटा नेक्सॉन आणि टाटा नेक्सॉन मैक्ससह इलेक्ट्रिक पीव्ही सेगमेंटमध्ये सर्वात पुढे आहे. आता महिंद्राने आपल्या 'ईव्ही कंपनी' अंतर्गत एक्सयूवी400 ईव्हीची घोषणा केली आहे.6 / 8 महिंद्राच्या एसयूव्हीची थेट स्पर्धा टाटा नेक्सनसोबत असेल. यामुळेच या एसयूव्हीची रेंज 300 किमीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल आहे. 7 / 8 सध्या नेक्सन ईव्ही 312 किमीची रेंज देते. दुसरीकडे, MG ZS EV (एमजी जेडएस ईव्ही) फुल चार्जमध्ये 461 किमीच्या रेंजसह या यादीत सर्वात पुढे आहे. एमजी मोटरने नुकतेच या मॉडेलला एक नवीन मोटर आणि एक मोठ्या बॅटरीसह अपग्रेड केले आहे.8 / 8 एका रिपोर्टमध्ये, CRISIL ने दावा केला आहे की, यूटिलिटी वाहनांची भागीदारी, ज्यात SUV आणि MUV सामील आहेत, आर्थिक वर्ष, 22 च्या पहिल्या नऊ महिन्यात वाढून 48 टक्के होईल. रिपोर्टमध्ये भविष्यवाणी करण्यात आली आहे की, यात एसयूव्ही सेगमेंटच्या वाहनांचा वाटा 53 टक्के पर्यंत असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications