mahindra xuv700 and thar suv recalled by automobile company due to turbocharger issue
Mahindra ने परत मागवल्या XUV700 आणि Thar कार, निदर्शनास आली मोठी गडबड! पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 2:00 PM1 / 7भारतातील SUV कारमध्ये अग्रगण्य कंपनी असलेल्या महिंद्राने आपल्या दोन शक्तिशाली SUV परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने Mahindra XUV700 आणि Thar परत मागवल्या आहेत. कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही कारमध्ये महिंद्रा XUV700 आणि थारचा समावेश आहे. 2 / 7टर्बोचार्जरमुळे महिंद्राने दोन्ही एसयूव्ही परत मागवल्या आहेत. महिंद्रा XUV700 परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये XUV700 परत मागवण्यात आल्या होत्या. महिंद्रानं नुकतंच XUV700 आणि Thar SUV च्या किमतीही वाढवल्या आहेत.3 / 7महिंद्रा XUV700 आणि थारमध्ये आढळलेल्या कमतरतांमुळे अनेक कार मालक चिंतेत आहेत. टर्बोचार्जर समस्येचं निराकरण करण्यासाठी कंपनी महिंद्रा XUV700 डिझेलच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटवर टर्बो अॅक्ट्युएटर लिंकेज बदलत आहे.4 / 7Mahindra XUV700 चे पेट्रोल व्हेरियंट त्याच्या GVV पाईप आणि कॅनिस्टरवर T-Block कनेक्टर इंस्टॉलेशनचे परीक्षण करण्यासाठी परत मागवण्यात आल्या आहेत. 5 / 7लाइफस्टाइल ऑफ-रोडर SUV Mahindra Thar बद्दल बोलायचं तर कारच्या डिझेल व्हेरियंटला देखील Mahindra XUV700 सारख्या टर्बो चार्जर अॅक्ट्युएटरची समस्या भेडसावत आहे. याशिवाय, महिंद्रा दोन्ही एसयूव्हीचे टायमिंग बेल्ट आणि ऑटो-टेंशनर देखील बदलत आहे. पण सर्व XUV700 आणि थार मॉडेल परत मागवले गेलेले नाहीत.6 / 7महिंद्रा XUV700 आणि थारची किती युनिट्स या कमतरतेमुळे प्रभावित झाली आहेत हे सध्या स्पष्ट नाही. दोन्ही SUV च्या मालकांनी महिंद्राच्या वेबसाइटला भेट द्यावी आणि 'सर्व्हिस-ऍक्शन' सेक्शनला भेट देऊन त्यांना आपली कार परत मागवण्यात आली आहे की नाही याची माहिती मिळवता येणार आहे. त्यामुळे कार मालकांनी या प्रकरणाची योग्य माहिती त्यांच्या जवळच्या महिंद्रा डीलरकडून घेतली तर उत्तम.7 / 7महिंद्राने नुकतेच Mahindra XUV700 आणि थारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने Mahindra XUV700 च्या किमती 37,000 रुपयांनी वाढवल्या आहेत, तर Mahindra Thar च्या किमती 28,000 रुपयांनी वाढल्या आहेत. दोन्ही एसयूव्ही समान इंजिन पॉवरने सुसज्ज आहेत. यामध्ये 2.2L टर्बो-डिझेल इंजिन, 2.0L टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications