mahindra XUV700 get scored 5 star rating for adult safety in Global NCAP crash test
Mahindra ची कमाल! XUV700 क्रॅश टेस्टमध्ये पास; मिळाले ५ स्टार रेटिंग, पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 5:57 PM1 / 9आताच्या घडीला स्वदेशी TATA आणि Mahindra यांच्या कार सर्वांत सुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीच्या कार सर्वाधिक खपाच्या असल्या तरी क्रॅश टेस्टमध्ये मात्र जोरदार आपटी खाल्ल्याचे दिसत आहे. 2 / 9प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहने बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. 3 / 9यातच आता Mahindra च्या XUV300 कारनंतर आता XUV700 या कारनेही ग्लोबल NCAP टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत संपूर्ण देशभरात Mahindra XUV700 ला ७५ हजाराहून अधिक बुकिंग मिळाल्याने ही कार ब्लॉकबस्टर ठरली आहे. 4 / 9नवीन Mahindra XUV700 ने आता टॉप सेफ्टी स्कोअर करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी XUV700 ने १७ पैकी १६.०३ गुण मिळवून ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. सन २०१४ नंतर चाचणी केलेल्या भारतीय बनावटीच्या वाहनांमध्ये ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वोत्तम ठरली आहे.5 / 9Mahindra XUV700 कारच्या स्ट्रक्चरला देखील स्टेबल रेटिंग दिले गेले आहे. टेस्टिंगदरम्यान, पुढच्या प्रवाशांना झालेल्या संभाव्य दुखापती देखील किरकोळ आहेत आणि क्रॅश टेस्ट डमी इंजरी एनालिसिसवर कोणताही नारंगी किंवा लाल रंग न दिसणे चांगले असल्याचे सांगितले जात आहे. 6 / 9Mahindra XUV700 ने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक ४९ पैकी ४१.६६ गुण मिळवून आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर देखील मिळवला आहे. XUV700 या कारची किंमत १९.७९ लाख रुपये आहे. महिंद्रा १.८ लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करत आहे. 7 / 9XUV700 चे आतील लेआउट उत्तम असून, मध्यभागी १०.२५ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टियरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरुफ यांसारखे फिचर्स कंपनीकडून दिले जात आहेत. 8 / 9XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते. यामध्ये Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.9 / 9XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, ३६० डिग्री साराऊंड व्ह्यू असे सेफ्टी फीचर्स मिळतात. XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल या दोन पर्यांयसह ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications