Mahindra's most expensive SUV is coming ... wait five days
महिंद्राची सर्वांत महागडी एसयुव्ही येतेय... पाच दिवस वाट पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:09 PM1 / 7महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची आजपर्यंतची सर्वात महागडी एसयुव्ही भारतीय बाजारात दाखल होणार आहे. SUV Alturas G4 ला 24 नोव्हेंबरला लाँच करण्यात येणार असून स्कॉर्पिओ, एसयुव्ही 500 नंतर महिंद्राची ही आतापर्यंतची सर्वात प्रिमियम कार असणार आहे.2 / 7या कारची किंमत 25 ते 30 लाखांच्या दरम्य़ान असण्याची शक्यता आहे. ही फोर्ड एंडोव्हर, टोयोटा फॉर्च्युनर, होंडा सीआरव्ही यासारख्या तगड्या कारना टक्कर देणार आहे. सध्या महिंद्राने या कारबाबत माहिती दिलेली नाही. 3 / 7या कारच्या नावाबाबत ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कंपनीने एसयुव्ही श्रेणीमध्ये या कारचे नाव Y400 असे ठेवले होते. 4 / 7एक्सयुव्ही 500 नंतर या कारचे नाव XUV700 असण्याची चर्चा होती. मात्र, महिंद्राने सर्वांचेच अंदाज चुकवत Alturas G4 असे नाव ठेवले आहे. या नावाचा अर्थ उंची किंवा शिखर असे होते. या एसयुव्ही कारद्वारे महिंद्रा विक्रीमध्ये इतिहास रचण्याच्या प्रयत्नात आहे. 5 / 7कंपनीने Alturas G4 ची बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. 50 हजार रुपयांत बुक करता येते. 6 / 7ऑनलाईन बुकिंगसाठी https://www.alturasg4.com,https://www.m2all.com/Alturas-G4.html या लिंकवर जाऊन बुक करता येते. महिंद्रा डिलरशिपकडेही बुक करता येते. बुकिंग रद्द किंवा बदलण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत वेळ मिळणार आहे. 7 / 7टेस्ट ड्राईव्हसाठी कार 26 नोव्हेंबरनंतर उपलब्ध होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications