शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५० हजार द्या आणि घरी न्या प्रसिद्ध WagonR, ३४ किमीचं मायलेज; पाहा किती असेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 8:39 AM

1 / 5
मारुती सुझुकी वॅगनआर जून महिन्यात देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हल्ली अनेकजण सीएनजी कार्सना पसंती देत आहेत. अशा परिस्थितीत स्मॉल फॅमिली कार म्हणून लोकांमध्ये वॅगनआर खूप लोकप्रिय आहे.
2 / 5
वॅगनआरच्या CNG व्हेरिअंटलाही सध्या खूप मागणी आहे. कमी किमतीत, उत्तम मायलेज, रिसेल व्हॅल्यूमुळे वॅगनआरला चांगलीच पसंती दिली जाते. जर तुम्ही मारुती WagonR साठी 50000 रुपये डाउन पेमेंट केले, तर त्यानंतर तुम्हाला EMI बसेल याची माहिती आपण पाहू. यासोबतच या कारमध्ये काय विशेष आहे तेदेखील पाहू.
3 / 5
मारुती वॅगनआरमध्ये S-CNG 1.0-लिटर, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन CNG मोडमध्ये 58 bhp पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये असताना, हे इंजिन 81 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. S-CNG व्हेरिअंट 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मारुती वॅगनआर एस-सीएनजी ड्युअल इंटरडिपेंडेंट ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमने सुसज्ज आहे. तसंच कारच्या परफॉर्मन्सवर कोणताही परिणाम होणार नाही अशा प्रकारे यात किट बसवण्यात आले आहे.
4 / 5
Maruti WagonR ची किंमत ₹ 5.47 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ₹ 7.20 लाखांपर्यंत जाते. कारच्या LXI CNG व्हेरिअंटची किंमत 6.42 लाख रुपये आहे. दरम्यान, WagonR पेट्रोल मोडवर 25.19 kmpl आणि CNG वर 34.05 kmpl मायलेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
5 / 5
जर तुम्ही 50 हजार रुपयांचं डाऊनपेमेंट देऊन मारूती सुझुकी वॅगन आर सीएनजी व्हेरिअंट खरेदी करत असाल तर यावर 9 टक्क्यांच्या हिशोबानं 5 वर्षांसाठी महिन्याला तुम्हाला 13864 रूपयांचा ईमएमआय भरावा लागेल. 5 वर्षांसाठी तुमच्याकडून 163949 रूपयांचं व्याज आकारलं जाईल. यावर मिळणारं लोन, डाऊन पेमेंट, व्याजदर हे तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोअरवर अवलंबून आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन