शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Alto 800: Bike च्या किमतीत घरी घेऊन जा नवीकोरी कार, मिळेल 31kmpl पर्यंतचे मायलेज...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 8:45 PM

1 / 8
Maruti Alto 800 EMI Calculator: कार खरेदीसाठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना शुभ महिना मानला जातो. या काळात बहुतांश कार कंपन्या कारच्या खरेदीवर मोठी सूट देतात.
2 / 8
तसेच जानेवारीपासून कारच्या किमतीत वाढ होऊ लागते, त्यामुळेच डिसेंबरमध्ये कार खरेदी करून तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. तुम्ही बजेटच्या अडचणींमुळे कार खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलत असाल तर तुम्हाला तसे करण्याची गरज नाही.
3 / 8
आम्ही तुम्हाला Maruti Alto 800 बद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही अगदी मोटारसायकलच्या किमतीत घरी घेऊन जाऊ शकता. Maruti Alto 800 ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे.
4 / 8
दर महिन्याला या वाहनाची जोरदार विक्री होते. कंपनी या पेट्रोल गाडीसोबत सीएनजी किटदेखील देते. विशेष म्हणजे, या कारची किंमत 3.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.03 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
5 / 8
विशेष म्हणजे, एका ऑफर अंतर्गत बाईकच्या किमतीत तुम्ही ही खरेदी करू शकता. तुम्ही या गाडीचे बेसिक मॉडेल विकत घेतले, तर त्याची ऑन-रोड (दिल्ली) किंमत रु. 3.72 लाख आहे.
6 / 8
समजा तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर या कंपनीची कार EMI वर खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही सुमारे 80,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले आणि 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर 9.8 टक्के व्याजदराने तुम्हाला फक्त 6,200 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच मोटारसायकलच्या किमतीत तुम्ही कार घरी घेऊन जाऊ शकता.
7 / 8
अल्टो 800 इंजिन आणि वैशिष्ट्ये- Maruti Suzuki Alto 800 ला 0.8-लीटर पेट्रोल इंजिन (48PS आणि 69Nm) मिळते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यामध्ये सीएनजी किटचा पर्यायही देण्यात आला आहे.
8 / 8
CNG सह या कारचे मायलेज सुमारे 32KM प्रति किलो आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन