शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Alto With Sunroof: मारूती अल्टो आणि सनरुफ, मॉडिफिकेशन पाहून तुम्हीही म्हणाल व्हाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 6:08 PM

1 / 5
आजकाल लोक अल्टोमध्येही मॉडिफिकेशन करायला लागले आहेत. काही बदल लूकसाठी केले जातात तर काही बदल फीचर्स वाढविण्यासाठी केले जातात. उदाहरणार्थ, काही लोक अल्टोमध्ये सनरूफ बसवतात.
2 / 5
फोटोंमध्ये, तुम्ही पाहू शकता की मारुती अल्टोमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि त्यात सनरूफ बसवण्यात आले आहे. हे सर्व फोटोत्रे काही youtube व्हिडीओंवरून स्क्रीनशॉट म्हणून घेण्यात आली आहेत. खरं तर, यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात मारुती अल्टोमध्ये सनरूफ दिसत आहे. ज्यामध्ये आफ्टरमार्केट सनरूफ बसवले गेले आहे.
3 / 5
अल्टोवर बसवलेले सनरूफ कदाचित अनेकांना आवडेल पण कारवर आफ्टरमार्केट सनरूफ मिळणे ही फारशी चांगली कल्पना नाही. असे करणे टाळावे कारण त्याचे अनेक तोटे आहेत. आफ्टरमार्केट सनरूफ बसवल्याने कारची सुरक्षितता कमी होते कारण ते कारचे रुफ कट करून बसवले जाते.
4 / 5
आफ्टरमार्केट सनरूफ काही वेळा व्यवस्थित चालत नाहीत. इतकेच नाही तर त्यातून पाण्याची गळतीही सुरू होते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात पाणी थेट गाडीच्या आत शिरते.
5 / 5
काही काळापूर्वीपर्यंत मारुतीच्या कोणत्याही कारमध्ये सनरूफ उपलब्ध नव्हते, परंतु भारतात पहिल्यांदाच कंपनीने नुकत्याच लाँच झालेल्या २०२२ मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्टमध्ये सनरूफ दिले. यानंतर कंपनीने ग्रँड विटारामध्ये सनरूफही दिले आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन