maruti baleno best selling hatchback car in february 2023 know about Swift wagonr and alto
Swift-Wagon R-Alto ची क्रेझ घटली! आता या एकाच कारवर तुटून पडले ग्राहक, किंमत केवळ 6.56 लाख By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 1:29 PM1 / 6भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीने हॅचबॅक सेगमेंटवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप 4 कार मारुती सुझुकीच्या आहेत आणि या सर्वच्या सर्व कार हॅचबॅक सेगमेंटमधील आहेत. 2 / 6हे वाचल्यानंतर, मारुती ऑल्टो अथवा वॅगनआर सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार असतील, असे आपल्याला वाटले असेल. पण, तसे नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये मारुती सुझुकी बलेनो ही सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. या कारने ऑल्टो, वॅगनआर आणि स्विफ्टलाही मागे टाकले आहे.3 / 6Maruti Baleno - फेब्रुवारी 2023 मध्ये मारुती सुझुकी बलेनो (Maruti Baleno)च्या 18,592 युनिट्सची विक्री झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये 12,570 युनिट्सची विक्री झाली होती. वार्षिक आधारावर हिच्या विक्रीत 47.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मारुती बलेनोची प्राइस रेन्ज 6.56 लाख रुपयांपासून ते 9.83 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.4 / 6Maruti Swift - दुसऱ्या क्रमांकावर स्विफ्ट (Maruti Swift) आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हिच्या 18,412 युनिट्सची विक्री झाली. फेब्रुवारी 2022 मध्ये 19,202 युनिट्सची विक्री झाली होती. हिच्या विक्रीत वार्षीक आधारावर 4.11% टक्क्यांची घसरण आहे.5 / 6Maruti Alto - तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Alto) आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हिच्या 18,114 युनिट्सी विक्री झाली. तर फेब्रुवारी 2022 मध्ये हिचे 11,551 युनिट्स विकले गेले होते. वार्षिक विक्रीचा विचार करता हिची फेब्रुवारी 2023 मधील विक्री 56.82 टक्क्यांनी वाढली आहे.6 / 6Maruti Wagon R - चौथ्या क्रमांकावर आहे, वॅगनआर (Maruti Wagon R). हिचे फेब्रुवारी 2022 मध्ये 14,669 युनिट्स विकले गेले होते. या तुलनेत गेल्या महिन्यात म्हणजे, फेब्रुवारी 2023 मध्ये हिच्या 16,889 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक विक्रीचा विचार करता हिच्या विक्रीत 15.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications