शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 1:03 PM

1 / 10
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी आकाश गाठलेले असताना मारुतीने (Maruti Suzuki) आपल्या ताफ्यातील सर्वच कार सीएनजीवर करण्याचे ठरविले आहे. यामुळे येत्या काही काळात मारुतीची हॅचबॅक स्विफ्ट आणि कॉम्पॅक्ट सेदान डिझायर सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
2 / 10
मात्र, याचबरोबर मारुती ४ स्टार सेफ्टी रेटिंग असलेली तगडी कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारदेखील सीएनजी अवतारात आणणार आहे.
3 / 10
मारुतीने गेल्या वर्षीपासून बीएस6 आल्याने डिझेल इंजिन कारमध्ये देणे बंद केले आहे. यामुळे मारुतीच्या ताफ्यातील सर्व कार या पेट्रोल इंजिनच्या येतात. यापैकी बऱ्याच कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहेत.
4 / 10
नेक्सा ब्रँडच्या कार मात्र, फक्त पेट्रोलमध्येच उपलब्ध आहेत. मारुतीच्या स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा आणि सियाझ या कार अद्याप सीएनजीवर आलेल्या नाहीत.
5 / 10
या कार सीएनजीवर आणण्यासाठी ग्राहकांकडूनही मोठी मागणी होत आहे. आणि मारुतीने सियाझ वगळता तीन कार या सीएनजीवर आणण्याचे ठरविले आहे. येत्या काळात सियाझदेखील सीएनजीवर आली तर वावगे ठरणार नाही.
6 / 10
मारुती ब्रेझा (SUV Maruti Suzuki Vitara Brezza) ही कार आता सीएनजीमध्ये (CNG) येणार आहे. मारुति सुजुकी विटारा ब्रेजा ही मोठ्या काळापासून कंपनीची टॉप सेलिंग मिड साईज एसयुव्ही आहे.
7 / 10
ही मारुती ब्रेझा सीएनजीमध्ये (Maruti Brezza CNG) येणार आहे. यामुळे टाटाच्या नेक्सॉन सीएनजीला कडवी टक्कर मिळणार आहे. मारुतीची ही कार ह्युंदाईकडे जाणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय असणार आहे.
8 / 10
मीडिया रिपोर्टनुसार येणारी Maruti Suzuki Vitara Brezza CNG मध्ये .5 लीटर K15 नॅचरली एस्पिरेटेड इंजिन असेल. सीएनजी व्हर्जनमध्ये 6000rpm वर 91 bhp ची ताकद आणि 4,400rpm वर 122 Nm चा टॉर्क मिळेल.
9 / 10
ही कार 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि 4 स्पीड टॉर्क कन्वर्टरसोबत येईल. येत्या काळात याबाबत आणखी माहिती समोर येईल.
10 / 10
मारुती सुझुकीच्या ताफ्यात सध्या अल्टोपासून अर्टिगापर्यंत सीएनजी कार आहेत. यामध्ये Maruti S-Presso CNG, Maruti Alto CNG, Maruti WagonR CNG, Maruti Celerio CNG, Maruti Ertiga CNG, Maruti Eeco CNG या कार आहेत. तसेच काही महिन्यांत Maruti Swift CNG आणि Maruti Dzire CNG सारख्या कारदेखील येणार आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीPetrolपेट्रोलMarutiमारुती