शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Grand Vitara उद्या होणार लाँच; जाणून घ्या, या संबंधित 5 मोठ्या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 4:08 PM

1 / 7
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्ही अखेर भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी ही एसयूव्ही लाँच होणार आहे. इच्छुक ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून नवीन ग्रँड विटारा ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. कारचे बुकिंग सुरू झाले आहे.
2 / 7
दरम्यान, ऑगस्ट 2022 मध्ये कारची किंमत जाहीर केली जाऊ शकते. तूर्तास, बुधवारी कारचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स याबद्दल माहिती दिली जाणार आहे. पण, त्याआधी आम्ही तुम्हाला नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी संबंधित 5 मोठ्या गोष्टी सांगत आहोत.
3 / 7
नवीन मारुती ग्रँड विटाराची विक्री नेक्सा प्रीमियम डीलरशिप नेटवर्कद्वारे केली जाईल. हे ब्रँडचे नवीन फ्लॅगशिप मॉडेल असेल आणि जुन्या एस-क्रॉस क्रॉसओवरची जागा घेईल.
4 / 7
नवीन ग्रँड विटाराचे प्रोडक्शन कर्नाटकातील बेंगळुरूजवळील टोयोटाच्या बिदाडी येथील प्रोडक्शन सेंटरमध्ये केले जाईल. नवीन ग्रँड विटारा सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर (काही बदलांसह) डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे.
5 / 7
नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये दोन इंजिनचे ऑप्शन मिळतील. यात एक ऑप्शन म्हणून सुझुकीचे 1.5L K15C ड्युअल-जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन, माइल्ड हायब्रिड सेटअपसह मिळेल. दुसरा ऑप्शन म्हणून मजबूत-हायब्रिड टेक्नॉलिजी असलेले टोयोटाचे 1.5L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल.
6 / 7
यात पॅनोरामिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रीअर एसी व्हेंट्ससह ऑटोमॅटिक एसी, ईव्ही मोड (स्ट्राँग हायब्रीड), एचयूडी, कनेक्टेड कार टेक, रिक्लिनिंग रीअर सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील.
7 / 7
या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, MG Aster, Volkswagen Taigun आणि Skoda Kushak सारख्या कारसोबत होईल. नवीन विटारा कारची किंमत 9.5 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहनcarकार