शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुती आणि महिंद्राच्या १५ कारवर मोठी सवलत; 'लाखमोला'ची बचत

By देवेश फडके | Published: January 23, 2021 2:42 PM

1 / 15
सन २०२० हे वर्ष ऑटोमोबाइल सेक्टरसाठी खूपच वाईट ठरले, असे म्हटले जाते. मात्र, आता हळूहळू ऑटोमोबाइल क्षेत्र गती पकडत आहे, असे सांगितले जात आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील स्पर्धाही वाढली आहे. परदेशातील मोठे ब्रँडनी आता भारताकडे मोर्चा वळवला असून, नवनवीन गाड्या भारतीय बाजारात सादर केल्या जात आहेत. त्यातच इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठीही प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे विविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रॉनिक कार सादर करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून विविध ऑफर, डिस्काऊंट आणले जात आहे. नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी जानेवारी हा महिना अतिशय फायदेशीर ठरू शकतो. कारण वाहन निर्मितीत आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी आणि महिद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांकडून आपल्या विविध चारचाकी वाहनांवर हजारो रुपयांचा भरघोस डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. ही ऑफर ३१ जानेवारीपर्यंत वैध आहे.
2 / 15
Mahindra Alturas G4 या गाडीवर ३.०६ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच यामध्ये २.२० लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि ५० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. शिवाय, या गाडीवर १६ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस आणि २० हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
3 / 15
Mahindra KUV100 NXT या गाडीवर ग्राहकांना एकूण ६२ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यात ३८ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
4 / 15
Maruti Suzuki Wagon-R या सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाडीवर ग्राहकांना ३९ हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये ८ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज आणि ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
5 / 15
Mahindra XUV500 या एसयूव्ही गाडीवर ग्राहकांना ५९ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ९ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस तसेच १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
6 / 15
Maruti Suzuki S-Presso या अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या गाडीवर ग्राहकांना ४४ हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
7 / 15
Mahindra Scorpio या महिंद्राच्या सर्वाधिक लोकप्रिय गाडीवर ३९ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये कंपनीकडून १० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, ४ हजार ५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस आणि १० हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
8 / 15
Maruti Suzuki Dzire या मारुती सुझुकीच्या लोकप्रिय गाडीवर ३२ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये ८ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ४ हजारांचा कॉर्पोरेट बोनस ऑफर केला जात आहे.
9 / 15
Mahindra Marazzo या एमपीव्ही प्रकारातील गाडीवर ग्राहकांना ३६ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच ६ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस कंपनीकडून ऑफर केला जात आहे.
10 / 15
Maruti Suzuki Celerio या गाडीवर ग्राहकांना ४४ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस कंपनी ऑफर करत आहे.
11 / 15
Maruti Suzuki Swift या अलीकडेच विक्रीमध्ये नंबर वन ठरलेल्या गाडीवर ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीकडून ३४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये १० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस व ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस ऑफर केला जात आहे.
12 / 15
Mahindra Bolero या महिंद्राच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या गाडीवर ग्राहकांना कंपनीकडून २४ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये ३ हजार ५०० रुपयांचा कॅश डिस्काऊंट, १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस तसेच ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस आणि ५ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट ऑफर केला जात आहे.
13 / 15
Maruti Suzuki Ertiga या गाडीवर ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीकडून ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस ऑफर केला जात आहे.
14 / 15
Maruti Suzuki Vitara Brezza या गाडीवर ग्राहकांना कंपनीकडून ३४ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये १० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, तसेच ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस ऑफर केला जात आहे.
15 / 15
Maruti Suzuki Eeco या लोकप्रिय गाडीवर मारुती सुझुकीकडून ग्राहकांना ३४ हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. यामध्ये १० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
टॅग्स :carकारMaruti Suzukiमारुती सुझुकीMahindraमहिंद्रा