शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

30Km मायलेज अन् हायटेक फीचर्स! Maruti च्या 'या' कारनं सगळ्यांनाच मागे टाकलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 3:27 PM

1 / 7
बहुतांश चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांसाठी मे महिना चांगला राहिला आहे. मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्सपर्यंत, अनेक कंपन्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. यात मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक कार मारुती बलेनोची सर्वाधिक विक्री झाली आहे. हायटेक फीचर्स आणि अत्याधुनिक सेफ्टीने सुसज्ज असलेल्या या कारने सगळ्यांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
2 / 7
अलीकडेच मारुती सुझुकीने बलेनोला काही नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहे. आता कारमध्ये पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड सीएनजी किटदेखील मिळणार आहे. मारुती बलेनोच्या बेस व्हेरियंटमध्येही कंपनीने ईएसपी आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स दिले आहेत. नवीन फीचर्स जोडल्यानंतर कारच्या एंट्री लेव्हल व्हेरिएंटची किंमत सुमारे 12,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या कारची किंमत 6.61 लाख ते 9.88 लाख रुपये आहे.
3 / 7
मारुती सुझुकीने मे महिन्यात बलेनोच्या एकूण 18,733 युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या एकूण 13,970 युनिट्सपेक्षा 34 टक्के अधिक आहे. यासह, ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्विफ्ट असून, या कारच्या एकूण 17349 युनिट्सची विक्री झाली आहे. वॅगनआर हॅचबॅक 16,258 युनिट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4 / 7
मे महिन्यातील टॉप-5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार:- मारुती बलेनो 18,733 13,970, मारुती स्विफ्ट 17,349 14,133, मारुती वॅगनआर 16,258, ह्युंदाई क्रेटा 14,449 10,973, टाटा नेक्सॉन 14,423 14,614
5 / 7
मारुती बलेनोमध्ये काय खास आहे:- कंपनीने भारतात लॉन्च केलेली पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. कंपनीने पहिल्यांदा ही ऑक्टोबर 2015 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केली होती. ही कार जागतिक बाजारपेठेतदेखील असून, इतर बाजारपेठांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अलीकडेच, कंपनीने या कारला नवीन हाय-टेक फीचर्ससह अपडेट केले आहे.
6 / 7
ही कार एकूण 9 प्रकारांमध्ये येते आणि 1.2-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जी 12V सॉफ्ट-हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 89Bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. कारचे पेट्रोल व्हेरिएंट 22 किमी/ली पर्यंत आणि CNG व्हेरिएंट 30 किमी/किलो पर्यंत मायलेज देते.
7 / 7
मारुती बलेनोमध्ये हिल होल्ड असिस्ट, 6 एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट, सीट-बेल्ट टेंशनर फीचर्स मिळतात. याशिवाय, कारमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिअर डिफॉगर, ऑल पॉवर विंडो, कीलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल देखील आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन