शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti च्या 'या' खास कारची बाजारात धूम! लाँचनंतर महिनाभरातच 50 हजार युनिट बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 9:42 PM

1 / 8
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) गेल्या महिन्यातच आपली प्रिमियम हॅचबॅक कार मारुती बलेनोचे फेसलिफ्ट (Maruti Baleno facelift 2022) मॉडेल लाँच केले. या कारची मागणी एवढी अधिक आहे की, ही कार लाँच झाल्यानंतर, एका महिन्याच्या आतच 50,000 युनिट्स बुक झाले आहेत.
2 / 8
लाँचच्या आधीच 25000 बुकिंग - मारुती बलेनो ही देशातील टॉप-5 बेस्ट सेलिंग कार्स (Best Selling Top-5 Cars in India) पैकी एक आहे. ही कार लाँच होण्यापूर्वीच हिचे 25,000 युनिट बुक झाले होते.
3 / 8
आता या कारचे एकूण 50,000 युनिट बुक झाले आहेत. कंपनीने या कारसाठी 11,000 रुपये एवढी बुकिंग अमाउंट ठेवली आहे.
4 / 8
6.5 लाख पेक्षा कमी किंमत - मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक 2022 Baleno ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.35 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये एवढी आहे. महत्वाचे म्हणजे या कारमध्ये कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत.
5 / 8
ही कार, सिग्मा, डेल्टा, डेल्टा एएमटी, जेटा, जेटा एएमटी, अल्फा आणि अल्फा एएमटी, अशा 7 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. हिच्या अधिकांश व्हेरिअंटमध्ये सुक्षिततेवर (Maruti Baleno Safety) विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि 6 एअरबॅग्जदेखील देण्यात आल्या आहेत.
6 / 8
सब्सक्रिप्शनवरही घेऊ शकता - जर आपल्याला मारुती बलेनो खरेदी करायची नसेल, तर कंपनीने बलेनो फेसलिफ्टसाठी सबस्क्रिप्शन स्कीमही सुरू केली आहे. या योजनेची मासिक फीस 13,999 रुपयांपासून सुरू होते. यात वाहन नोंदणी, देखभाल, विमा आणि रोड साईड असिस्टेंटचा समावेश आहे.
7 / 8
दमदार फिचर्स - नवीन बलेनोमध्ये 9-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. मारुतीने कोणत्याही कारमध्ये हे फिचर पहिल्यांदाच दिले आहे. कारला SmartPlay Pro+ साउंड आहे. जो Arkamys सराउंड सेन्सशी जोडलेला आहे. याशिवाय कंपनीने या गाडीत 360 डिग्री व्ह्यू कॅमेराही दिला आहे. याशिवाय, या नव्या बलेनोमध्ये एक कंपनी हेडअप डिस्प्लेही दिला आहे.
8 / 8
फ्युअल एफिशि्न्सीच्या बाबतीत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, बलेनोच्या मॅन्युअल आणि ऑटो मॉडेलचे मायलेज 22.34kmpl आणि 22.94kmp एवढे आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीbusinessव्यवसाय