maruti suzuki car discount upto 47000 rupees check here all details
मारुती कारवर 47,000 रुपयांपर्यंत ऑफर; किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:46 PM1 / 72 / 7Maruti Suzuki Ignis: या कारवर 33000 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. दुसरीकडे, यामध्ये केवळ मॅन्युअल व्हेरिएंटवर 20000 रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिला जात आहे. मारुती इग्निसमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 83 बीएचपी पॉवर जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.3 / 7Maruti Suzuki Ciaz: या कारवर 33000 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर, या कारवर कोणतेही कॅश डिस्काउंट दिले जात नाही. या कारची स्पर्धा होंडा सिटी, स्कोडा स्लाव्हिया यांसारख्या कारशी आहे. सियाजमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 105 बीएचपी पॉवर जनरेट करते. तसेच, 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.4 / 7Maruti Suzuki S-Cross: कंपनीची या कारवर 47000 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. Zeta व्हेरिएंटवर 17000 रुपयांची कॅश डिस्काउंट आणि उर्वरित मॉडेलवर 12000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आहे. दुसरीकडे, एक्सचेंज बोनस आणि 30000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.5 / 7Maruti Suzuki Alto: मारुतीची ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 796 सीसी इंजिन आहे. हे पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते. हे 22.05 ते 31.59 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.6 / 7Maruti Suzuki Baleno: मारुती सुझुकीने अलीकडेच नवीन बॅलेनो हॅचबॅक लाँच केले आहे आणि कार निर्माता या महिन्यात त्यासाठी कोणतीही ऑफर देत नाही. जुन्या मॉडेलप्रमाणेच, नवीन मॉडेलने लॉन्च झाल्यानंतर एका महिन्यात 50,000 बुकिंग केले आहेत. प्रीमियम हॅचबॅक खरेदी करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत बलेनो सीएनजी लाँच करणार आहे. 7 / 7Maruti Suzuki XL6: मारुती सुझुकी आपल्या सहा-सीटर MPV वर कोणतीही सूट देत नाही. मात्र, या महिन्याच्या अखेरपर्यंत मिड-सायकल फेसलिफ्ट मिळण्याची आशा आहे. कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त, यामध्ये अधिक मायलेज असणारे इंजिन आणि 6-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. XL6 फेसलिफ्ट एर्टिगा फेसलिफ्टला फॉलो करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications