शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti च्या 'या' कारवर मिळतोय 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:40 PM

1 / 6
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑटो मार्केटमध्ये कारवर शानदार डिस्काउंट ऑफर्सचा सुरू झाल्या आहेत. मारुती सुझुकी कंपनी निवडक नेक्सा कारवर डिस्काउंट देत आहे, ज्यामध्ये त्यांची सर्वाधिक विक्री होणारी कार बलेनो आहे. देशातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि एक्सचेंज बोनस देत आहे, जे 65,000 रुपयांपर्यंत आहेत.
2 / 6
बलेनो ही नेक्सा ब्रँडची सर्वात यशस्वी कार आहे. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्टेप एएमटी आणि सीएनजीसह बलेनोच्या संपूर्ण रेंजवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
3 / 6
याचबरोबर, बलेनो ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कस्टमर बेनिफिट्स आणि 5,000 रुपयांचा स्पेशल फेस्टिव्हल डिस्काउंट समाविष्ट आहे, जो 2 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान बुकिंगवर उपलब्ध असणार आहे. दरम्यान, बलेनोची रेंज 6.61 लाख रुपयांपासून 9.88 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
4 / 6
मारुती सुझुकी आपल्या Ciaz वर 48,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. ही मध्यम आकाराची सेडान 1.5-लिटर पेट्रोलसह येते. कारचे आउटपुट 103bhp आणि 138Nm आहे. तसेच, ही 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ऑप्शनसह उपलब्ध आहे. Ciaz ची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये ते 12.45 लाख रुपये आहे.
5 / 6
मॅन्युअल व्हेरिएंटवर उपलब्ध असलेल्या इग्निसवर 65,000 रुपयांपर्यंतची सर्वोच्च ऑफर दिली जात आहे. याचबरोबर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 55,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.
6 / 6
इग्निसमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 82bhp आणि 113Nm जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5-स्टेप एएमटी ऑप्शन मिळत आहे. इग्निसची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख ते 8.30 लाख रुपये आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकारAutomobileवाहन