शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WagonR, Alto सह मारुती सुझुकीच्या विविध कारवर बंपर सूट, होईल इतकी मोठी बचत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 2:50 PM

1 / 10
मारुती सुझुकी इंडियाच्या कारवर मार्च महिन्यात बंपर सूट दिली जात आहे. यात WagonR सारख्या लोकप्रिय कारवर ४१ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. कोणत्या मॉडलवर तुम्ही किती रुपये वाचवू शकता याची माहिती पुढीलप्रमाणे...
2 / 10
WagonR वर ४१ हजारांवर सूट कंपनीनं नुकतंच Maruti WagonR चं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. यात ड्युअल टोन कलर ऑप्शन देण्यात आला आहे. तसंच कार आता दोन इंजिन आणि अत्याधुनिक फिचर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आळी आहे. मार्च महिन्यात कंपनी WagonR च्या दोन मॉडलवर मोठी सूट देखील देत आहे.
3 / 10
WagaonR च्या १.२ लीटर इंजिन कारवर ४१ हजार रुपायंचा आणि १.० लीटर इंजिन कारवर ३१ हजार रुपयांची बचत तुम्ही करू शकणार आहात. नव्या WagaonR ची किंमत ५.३९ लाख रुपयांपासून सुरू होते.
4 / 10
देशातील सर्वात स्वस्त आणि मस्त कार म्हणून ओळख असलेल्या Maruti Alto वर मार्च महिन्यात तब्बल ३१ हजारांचा डिस्काऊंट दिला जात आहे. ऑल्टो कार बाजारावर गेल्या २० वर्षांहून अधिक काळ राज्य करत आहे. 800cc चं इंजिन असणाऱ्या कारची ओनरशीप कॉस्ट खूप कमी आहे. स्टँडर्ड व्हर्जनवर देखील ११ हजारांची बचत करू होणार आहे. या कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून सुरू होते.
5 / 10
मारुतीची हॅचबॅक कार 'एक्सप्रेसो'वर मार्च महिन्यात मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. या कारच्या खरेदीवर ३१ हजारांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. S-Presso चे इंटेरिअर फिचर्स आणि आपल्या सेगमेंटमधील सर्वात मोठी स्पेस ऑफर करते. ऑटोमॅटीक व्हर्जनवर १६ हजार रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते. या कारची किंमत ३.८५ लाख रुपयांपासून सुरू होते.
6 / 10
स्वस्त टॅक्सी आणि कार्गोचं काम करण्यासाठी उपयुक्त ठरणारी मारुतीची इको १.२ लीर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. या कारमध्ये ५ सीटर आणि ७ सीटरचा पर्याय उपलब्ध आहे. मार्च महिन्यात या कारवर २९ हजारांपर्यंतची बचत करता येऊ शकते. या कारची किंमत ४.५३ लाखांपासून सुरू होते.
7 / 10
फेब्रुवारी महिन्यात देशात सर्वाधिक विक्री झालेली कार स्विफ्ट कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे. यात १.२ लीटरचं डुअल जेट इंजिन देण्यात आलं आहे. या कारच्या मॅन्युअल ट्रान्समिशनवर मार्च महिन्यात २७ हजार आणि ऑटोमॅटिक मॉडलवर १७ हजार रुपयांची बचत करता येऊ शकेल. दिल्लीत या कारची एक्स-शोरुम किंमत ५.९० लाखांपासून सुरू होते.
8 / 10
मारुती सुझुकीच्या सेडान कार डिझायरवर मार्च महिन्यात २७ हजारांची बचत करू शकता. या कारमध्ये स्विफ्ट कार प्रमाणेच १.३ लीटरचं ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याच्या मॅन्युअल व्हेरिअंटवर २७ हजार आणि ऑटोमेटिक व्हेरिअंटवर १७ हजारांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. या कारची किंमत ६.०९ लाख रुपयांपासून सुरू होते.
9 / 10
Maruti Celerio कारचं नवं व्हर्जन बाजारात येऊन अवघे काही महिने झाले आहेत. पण याच्या सर्व व्हेरिअंटवर २६ हजारापर्यंतची बचत करता येणार आहे. यात १.० लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारची किंमत ५.१५ लाक रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये २६.६८ किमीपर्यंतचं मायलेज देते. त्यामुळे देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार म्हणून ही कार ओळखली जाते.
10 / 10
मारुती सुझुकी कंपनी लवकरच आपली एसयूव्ही Maruti Vitara Brezza चं नवं व्हर्जन लाँन्च होणार आहे. पण सध्या उपलब्ध असलेल्या मॉडलवर २२ हजार रुपयांचा बेनिफिट उपलब्ध आहे. यात १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. दिल्लीत या कारची एक्सरुम किंमत ७.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग