शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुती सुझुकीच्या ग्राहकांना बसणार झटका! 'या' महिन्यात कार खरेदी कराल तर होईल फायदा, किंमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 5:58 PM

1 / 7
मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहे. जानेवारीमध्ये मारुतीच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची शक्याता आहे. कंपनीने महागाई आणि अलीकडील नियामक आवश्यकतांमुळे खर्चात झालेली वाढ हे यामागचे कारण सांगितले आहे.
2 / 7
या किंमत वाढीचा परिणाम थेट ग्राहकांना होणार आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलच्या तुलनेत वेगळी असेल. मात्र, या किमती किती वाढणार याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
3 / 7
या अगोदर मारुती सुझुकी इंडियाने गुरुवारी नोव्हेंबरची आकडेवारी जाहीर केली होती. भारतीय बाजारपेठेतच कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात 1,39,306 वाहनांची विक्री केली. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आकडा 1,17,791 युनिट होता.
4 / 7
देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक असलेल्या मारुती अल्टो, एस-प्रेसोची विक्रीही जबरदस्त झाली आहे.
5 / 7
या कारची विक्री नोव्हेंबरमध्ये 18,251 वर होती. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 17,473 युनिट होती. त्याचबरोबर स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर या कारच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
6 / 7
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी आपल्या ग्रँड विटाराचे सीएनजी मॉडेल लॉन्च करणार आहे. या कारचे मायलेज वाढणार आहे आणि कार चालवण्याचा खर्चही कमी होणार आहे. ही कार मजबूत हायब्रिड इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे जी 27kmpl च्या मायलेजने चालते.
7 / 7
मारुती सुझुकी गेल्या काही महिन्यांपासून बलेनोच्या क्रॉसओवरचे व्हर्जन रोड टेस्ट करत आहे. कंपनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रीमियम हॅचबॅकचे क्रॉसओवर मॉडेल सादर करणार आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार