Maruti suzuki cars tops 4 out of 5 are maruti cars, tata nexon in list wagonr swift dezire tata cars
Marutiच्या 'या' स्वस्त हॅचबॅक कारची धुमाकूळ; झाली जबरदस्त विक्री, किंमतही ५.१८ लाखांपासून By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 8:57 PM1 / 8जानेवारी महिन्यात ग्राहकांनी हॅचबॅक आणि एसयूव्ही वाहनांना सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याचवेळी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) पुन्हा एकदा सर्वाधिक प्रवासी वाहन विकणारी कंपनी ठरली आहे. 2 / 8टॉप 10 पैकी फक्त 6 वाहने मारुती सुझुकीची आहेत. तसेच सर्वाधिक विक्री होणारी कारही याच कंपनीची होती. आपण जानेवारी 2022 मध्ये विक्री झालेल्या टॉप पाच गाड्यांची (Top 5 Cars Jan 2022) यादी पाहूया.3 / 8मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणारे वाहन ठरले आहे. जानेवारी 2022 मध्ये याच्या 20,334 युनिट्सची विक्री झाली. ही विक्री जानेवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 17,165 युनिट्सच्या तुलनेत 18 टक्क्यांनी अधिक आहे.4 / 8या हॅचबॅक कारची किंमत 5.18 लाख ते 6.58 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. मारुती वॅगन आर ही कार दोन पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध यातील पहिलं 1-लिटर (68PS/90Nm) आणि 1.2-लिटर (83PS/113Nm). यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स असे पर्याय आहेत.5 / 8या यादीत मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात याच्या 19,108 युनिट्सची विक्री झाली. ही विक्री जानेवारी 2021 च्या तुलनेत 11.22 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 17,180 कार्सची विक्री झाली होती. 6 / 8त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारुती सुझुकी डिझायरने जानेवारी 2022 मध्ये 14,967 युनिट्सची विक्री केली, जी जानेवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 15,125 युनिट्सच्या तुलनेत 1.04 टक्क्यांनी कमी आहे.7 / 8यादीत चौथ्या क्रमांकावर असलेली टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही होती. गेल्या महिन्यात 13,816 युनिट्सची विक्री झाली आहे, जी जानेवारी 2021 च्या तुलनेत 67.98 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारीत 8,225 कार्सची विक्री झाली होती. 8 / 8पाचव्या क्रमांकावर असलेल्या मारुती सुझुकी अल्टोने जानेवारी 2022 मध्ये 12,342 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 18,226 युनिट्सपेक्षा 32.41 टक्के कमी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications