शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki Cars: कोणत्या कारची किती वाढली किंमत? शोरुममध्ये जाण्यापूर्वी पाहा ही लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:14 AM

1 / 11
Maruti Suzuki Cars: वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नुकतेच आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. याचा अर्थ आता तुम्ही मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
2 / 11
2023 वर्ष सुरू होताच, मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेल्सच्या किमती 21,900 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने कोणकोणत्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत आणि किती रुपयांची वाढ केली आहे, याची माहिती आपण घेऊ.
3 / 11
Maruti Suzuki Alto K10 किंमतीबद्दल सांगायचे तर, कंपनीने या बजेट फॅमिली कारच्या किमतीत 10,000 रुपयांची वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर आता या कारची किंमत 3 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होईल आणि ती 5 लाख 95 हजार रुपयांपर्यंत जाते.
4 / 11
मारुती सुझुकी सेलेरियोच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आता ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 21,000 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. किमतीत वाढ झाल्यानंतर आता या कारची किंमत 5 लाख 25 हजारांपासून सुरू होऊन 7 लाख रुपयांपर्यंत जाईल.
5 / 11
मारुती अल्टोच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या फॅमिली कारच्या किमतीत 15,000 रुपयांची वाढ केली आहे. नवीन किंमतीबद्दल बोलायचे तर, आता या कारची किंमत 3 लाख 39 हजार रुपयांपासून सुरू होईल, जी 5 लाख 3 हजार रुपयांपर्यंत जाईल.
6 / 11
मारुती सुझुकी एस प्रेसोच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, 10,000 रुपयांच्या वाढीनंतर आता या कारच्या किमतीपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर आता या कारची किंमत 5 लाख 25 हजारांपासून सुरू होऊन 7 लाख रुपयांपर्यंत जाते.
7 / 11
मारुती सुझुकी वॅगनआरच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या कारची किंमत 21 हजार 900 रुपयांनी म्हणजेच जवळपास 22 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता तुम्हाला ही कार 5 लाख 44 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह मिळेल आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7 लाख 08 हजार रुपयांपर्यंत जाईल.
8 / 11
स्विफ्टच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आता या कारची किंमत 21 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कारची नवीन किंमत 5 लाख 92 हजार रुपयांपासून सुरू होईल आणि 8 लाख 71 हजार रुपयांपर्यंत जाईल.
9 / 11
जर आपण Brezza Price बद्दल बोललो तर मारुती सुझुकीची ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता 8 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. या कारची किंमत आता 7 लाख 99 हजार रुपयांपासून ते 13 लाख 80 हजार रुपयांपर्यंत आहे.
10 / 11
डिझायरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारच्या किमतीत 20 हजार रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता या कारची किंमत 8 लाख 41 हजारांपासून सुरू होईल जी 12 लाख 79 हजारांपर्यंत जाईल.
11 / 11
मारुती सुझुकीने Ertiga ची किंमत 8 हजार रुपयांनी वाढवली आहे, कंपनीच्या अधिकृत साइटवरून अशी माहिती समोर आलीये की की आता या कारची किंमत 6 लाख 24 हजार रुपयांपासून सुरू होते, जी 9 लाख 17 हजार 500 रुपयांपर्यंत जाते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी