Maruti suzuki celerio car launched in india prices starts under 5 lakh rupees
मारुतीची सर्वाधिक पेट्रोल बचत करणारी कार लॉन्च, सुरुवातीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 4:00 PM1 / 9नव्या जनरेशनची मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सेलेरिओ (Celerio) भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये एवढी आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 6.94 लाख रुपयांपर्यंत जाते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या पिढीची ही सेलेरिओ साधारणपणे पूर्णपणे बदलण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. (Maruti suzuki celerio car)2 / 9कंपनी नेक्सा डिलरशीपच्या माध्यमाने या कारची विक्री करणार असून या कारसाठी आजपासूनच 11,000 रुपयांपासून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने दोन वर्षांनंतर देशात लॉन्च केलेली ही नव्या जनरेशनची कार आहे.3 / 9मारुती सुझुकी सेलेरिओचे व्हेरिएंट्स आणि त्यांची किंमत - 1. सेलेरिओ एलएक्सआय एमटी - 4,99,000 रु. 2. सेलेरिओ व्हीएक्सआय एमटी - 5,63,000 रु. 3. सेलेरिओ व्हीएक्सआई एएमटी - 6,13,000 रु. 4. सेलेरिओ झेडएक्सआय एमटी - 5,94,000 रु. 5. सेलेरिओ झेडएक्सआय एएमटी - 6,44,000 रु. 6. सेलेरिओ झेडएक्सआय प्लस एमटी - 6,44,000 रु. 7. सेलेरिओ झेडएक्सआय प्लस एएमटी - 6,94,000 रु.4 / 9ही मारुती सुझुकीची अशी पहिलीच कार आहे, ज्यात नव्या जनरेशनचे 1.0-लीटर के-सीरीज पेट्रोल देण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे, की हे इंजिन आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत 23 टक्के अधिक इंधन वाचवते आणि हिला भारतीय पॅसेंजर कार मार्केटची सर्वाधिक पेट्रोल बचत करणारी कारही ही म्हटले जात आहे.5 / 9कंपनी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सतत्याने इंजिनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यात पेट्रोलची बचत करण्यावरही लक्ष दिले जात आहे. तसेच, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी पर्यंत चालवता येते, असा दावाही मारुती सुझुकीने केला आहे. 6 / 9कारची बूट स्पेस 313 लीटर आहे जी जुन्या मॉडेलच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे. कंपनीने लॉन्च दरम्यान सांगितले की, नव्या Celerio च्या CNG व्हेरिएंटवरही काम सुरू आहे आणि तीही लवकरच बाजारात आणली जाईल.7 / 9फिचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, नव्या जनरेशन सेलेरिओमध्ये पुश-बटन स्टार्ट-स्टॉप, हाईट-अॅडजस्टेबल ड्राइव्हर सीट, स्टेअरिंग कंट्रोल, इलेक्ट्रिकली फोल्ड करण्यायोग्य ओआरव्हीएम, 15-इंचाचे ब्लॅक फिनिश असलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. 8 / 9सुरक्षिततेच्या दृष्टीने कारसोबत दोन एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, रियर पार्किंग सेंसर्स आणि असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कारचे केबीन पूर्णपणे नव्या अवतारात सादर करण्यात आले आहे. यात आपल्याला टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणि अॅप्पल कारप्लेसह अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी ही मिळेल.9 / 9नव्या जनरेशनच्या मारुती सुझुकी सेलेरिओचा आकारही 55 मिमी रुंदीसह वाढवला गेला आहे, तर दरवाजाही आता 48 मिमी अधिक उघडतो. यामुळे कारमध्ये येणे आणि बाहेर जाणे सोपे होते. मागच्या प्रवाशांसाठीही केबिनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications