शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात ‘या’ कंपनीनं विकल्या सर्वाधिक कार्स, केला रेकॉर्ड; २०२२ मध्ये १.५ मिलियनपेक्षाही अधिक विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 6:22 PM

1 / 6
मारुती सुझुकी हा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली कार उत्पादक कंपनी ठरली आहे. मारुती सुझुकीने 25 दशलक्ष कार्स आणि SUV विकून एक मैलाचा दगड गाठला आहे. असा विक्रम करणारी मारुती सुझुकी ही पहिली कार उत्पादक कंपनी ठरली आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन जपानने 1982 मध्ये मारुती उद्योगाशी करार केल्यावर 40 वर्षांनी 25 दशलक्ष विक्रीचा टप्पा गाठला आहे.
2 / 6
मारुती सुझुकीने आजपर्यंत सुमारे 2.1 मिलियन हायब्रीड आणि सीएनजी मॉडेल्सची विक्री केली आहे. सुझुकी 2030 पर्यंत भारतात 6 नवीन ईव्ही लाँच करणार आहे. मारुती सुझुकीने दोन महिन्यांपूर्वी 25 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करून हा विक्रम केला होता. ही कामगिरी करणारी मारुती ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे.
3 / 6
कंपनीने 1983 मध्ये आपल्या कामकाजाला सुरूवात केली आणि मारुती 800 लाँच केली. आज हरियाणात गुरुग्राम आणि मानेसर येथे दोन प्रगत संयंत्रे आहेत. या दोन्ही प्रकल्पांची वार्षिक उत्पादन क्षमता 1.5 मिलियन युनिट्स इतकी आहे.
4 / 6
फेब्रुवारी 2006 मध्ये 5 मिलियन विक्रीचा टप्पा ओलांडण्यासाठी मारुती सुझुकीला उत्पादन सुरू झाल्यापासून 23 वर्षे लागली. पुढील 5 मिलियन युनिट्ससाठी 6 वर्षांचा कालावधी लागला.
5 / 6
मारुती सुझुकी सध्या भारतात 17 मॉडेल्स विकते आणि हायब्रीड, सीएनजी मॉडेल्स अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मारुती सुझुकीने आजपर्यंत सुमारे 2.1 मिलियन युनिट्स हायब्रीड आणि सीएनजी मॉडेल्सची विक्री केली आहे.
6 / 6
मारुती सुझुकी 2022 मध्ये 15 टक्के वार्षिक वाढ नोंदवून 1.5 मिलियन पेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली. सेलेरियो, वॅगन आर, स्विफ्ट, इग्निस, बलेनो यांसारख्या छोट्या कार्सनी ब्रँडच्या वाढीस मोठा हातभार लावला. 2022 मध्ये मारुती सुझुकीच्या 8,69,040 युनिट्सच्या विक्रीत त्यांचा वाटा 55 टक्के होता. कार उत्पादक कंपनीच्या एसयूव्ही आणि एमपीव्हीचा एकूण वाटा 21 टक्के आहे. गेल्या वर्षी कंपनीने 3,37,157 कार्सची विक्री केली होती.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी