शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 7-सीटर कारने ग्राहकांना घातली भुरळ; स्कॉर्पिओ, बोलेरो, फॉर्च्युनरदेखील फिक्या पडल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 5:55 PM

1 / 8
मारुती सुझुकीची 7-सीटर अर्टिगाने(Ertiga) गेल्या महिन्यात टॉप-10 कारमध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अर्टिगा टॉप-10 च्या यादीतून बाहेर होती. पण अखेर मे महिन्यात गाडीने टॉप-10 मध्ये पुनरागमन केले. autowithsid च्या रिपोर्टनुसार, कंपनीने गेल्या महिन्यात 10,500 अर्टिगाच्या विकल्या.
2 / 8
एप्रिल 2023 मध्ये फक्त 5,532 युनिट्सची विक्री झाली होती. मासिक आधारावर अर्टिगाच्या 4,968 युनिट्सची अधिक विक्री झाली. म्हणझेच, अर्टिगाची जवळपास 100% अधिक विक्री झाली आहे.
3 / 8
आपल्या सेगमेंटमध्ये, अर्टिगाने महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा बोलेरो, किआ केरेन्स, महिंद्रा XUV700, टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सुझुकी XL6, रेनॉल्ट ट्रायबर, ह्युंदाई अल्काझार आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या अनेक लक्झरी गाड्यांना मागे टाकले आहे.
4 / 8
Ertiga च्या विक्रीबद्दल बोलायचे झाले, तर ही देशातील लोकप्रिय 7 सीटर कार आहे. डिसेंबर 2022 ते मे 2023 या 6 महिन्यांत 53,553 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच दर महिन्याला सरासरी 8926 युनिटची विक्री होते.
5 / 8
अर्टिगाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 13.08 लाख रुपयांपर्यंत जाते. ही गाडी 11 व्हिरेएंटमध्ये उपलब्ध आहे. सर्व व्हेरिएंट्स हायब्रिड इंजिनसह येतात. अर्टिगामध्ये CNG चा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
6 / 8
या लोकप्रिय MPV मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये तुम्हाला CNG चा पर्यायदेखील मिळेल. गाडीचे पेट्रोल मॉडेल 20.51 kmpl मायलेज देते, तर, CNG मॉडेल 26.11 किमी/किलो मायलेज देते.
7 / 8
पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाइट्स, ऑटो एअर कंडिशन, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स यात मिळतात. 2023 अर्टिगामध्ये 7-इंच टचस्क्रीन युनिटऐवजी 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यात सुझुकीचे स्मार्टप्ले प्रो तंत्रज्ञान आहे, जे व्हॉईस कमांड आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह येते.
8 / 8
कनेक्टेड कार फीचर्समध्ये कार ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग, ओव्हर-स्पीडिंग अलर्ट आणि रिमोट फंक्शन्स यांचा समावेश आहे. यात 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरादेखील आहे.
टॅग्स :AutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकार