शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ १.५० लाखांत घरी घेऊन जा नवी कोरी Ertiga CNG; पाहा काय आहे स्कीम, किती पडेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 3:47 PM

1 / 9
Maruti Suzuki Ertiga CNG on EMI : मारुती सुझुकीच्या अर्टिगा या गाडीची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. सध्या या गाडीसाठी खुप मोठा वेटिंग पीरिअडही आहे. पण तुम्ही मारुतीची ही नवी कोरी गाडी अगदी दीड लाख रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.
2 / 9
या कारच्या सीएनजी व्हेरिअंटसाठी तुम्हाला जवळपास सात ते नऊ महिन्यांचा वेटिंग पीरिअड लागू शकतो. लोकांची या फॅमिली कारला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
3 / 9
यापूर्वी या कारचं सीएनजी मॉडेल केवळ VXI व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होतं. परंतु आता 2022 अर्टिंगा लाँच झाल्यानंतर सीएनजी मॉडेल VXI आणि ZXI या दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आलंय.
4 / 9
नव्या अर्टिगाच्या मॅन्युअल व्हेरिअंटचं मायलेज 20.51 kmpl इतकं आहे. तर अर्टिंगा ऑटोमॅटिकचं मायलेज 20.3 kmpl आणि नव्या अर्टिंगा सीएनजीचं मायलेज 26.11 km/kg पर्यंत आहे.
5 / 9
Maruti Suzuki Ertiga 2022 मध्ये K-Series 1.5-litre Dual VVT इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन एमपीव्हीद्वारे देण्यात येणाऱ्या फ्युअल एफिशिअन्सीला आणखी वाढवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
6 / 9
या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये 4 स्पीड ऑटोमॅटिक युनिट हटवून 6 स्पीड युनिट देण्यात आलं आहे. मॉडेलवर पॅडल शिफ्टर्स देखील उपलब्ध आहे.
7 / 9
नव्या Ertiga च्या केबिनला नवा लूक देण्यासाठीही काम करण्यात आलं आहे. 2022 मारुती सुझुकी एर्टिगामध्ये 7-इंच स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट टचस्क्रीन देण्यात आलं आहे. ते Android Auto आणि Apple CarPlay, Suzuki Connect क्कार टेक्नॉलॉडी, ऑनबोर्ड व्हॉइस असिस्टंट, EBD, ABS, हिल-होल्ड असिस्ट, ESP, ISOFIX माउंट, पार्किंग कॅमेरा, सपोर्ट करते.
8 / 9
क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, इलेक्ट्रीकली फोल्डेबल ओआरव्हीएम, एअर कूल्ड कपहोल्डर यांसारखी जबरदस्त फीचर्सही यात देण्यात आलेत. Maruti Suzuki Ertiga CNG VXI मॉडेलची किंमत 10.44 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे.
9 / 9
जर तुम्ही 1.50 लाख रूपयांचं डाऊन पेमेंट करून कार खरेदी केली, तर 7 वर्षांसाठी याचा ईएमआय 16513 रुपये बसेल. यानुसार तुम्हाला 7 वर्षांसाठी या गाडीवर 3,27,655 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
टॅग्स :Marutiमारुतीcarकार