शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाऊस किंवा खराब इंधनानं इंजिन खराब झालं, Maruti Suzuki करणार दुरुस्त; पाहा काय आहे स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 4:22 PM

1 / 7
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियानं (Maruti Suzuki India) आपल्या ग्राहकांसाठी एक नवी स्कीम आणली आहे. कारच्या इंजिनमध्ये पावसाचं पाणी गेलं (Hydrostatic Lock) किंवा भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन खराब अथवा बंद झाल्याच्या स्थितीत कंपनी ग्राहकांना एक विशेष कव्हर ऑफर करत आहे.
2 / 7
मारुती सुझुकीनं ग्राहकांसोबत आफ्टर सेल्स सर्व्हिस अधिक उत्तम करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांतर्गत ग्राहकांसाठी एक पॅकेज सादर केलं आहे. यामध्ये इंजिनमध्ये पावसाचं पाणी गेल्यास अथवा भेसळयुक्त इंधनामुळे झालेलं नुकसान कव्हर केलं जाईल.
3 / 7
रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याच्या किंवा बिघाड होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे, असं मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (सेवा) पार्थो बॅनर्जी यांनी पीटीआयला सांगितलं. अशा परिस्थितीत ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही. ग्राहकांनी आपलं वाहन पाणी साचलेल्या रस्त्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास आम्ही त्याची काळजी घेऊ, असंही ते म्हणाले.
4 / 7
या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी किरकोळ रक्कम द्यावी लागेल. वॅगन आर (Wagon R) आणि ऑल्टो (Alto) च्या ग्राहकांसाठी ही रक्कम ५०० रुपयांच्या जवळपास असेल, असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
5 / 7
हायड्रोस्टॅटिक लॉक किंवा इंधनाच्या भेसळीमुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यास, तुम्हाला तुमची कार कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनवर न्यावी लागेल आणि कंपनी कोणत्याही प्रश्नाशिवाय तुमच्या समस्यांचं निराकरण करणार आहे.
6 / 7
देशभरातील कोणत्याही मारुती सुझुकीच्या सर्व्हिस स्टेशनला भेट देऊन या स्कीमचा लाभ घेता येईल. मारुतीची सुझुकीची देशभरात २१०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ४२०० हून अधिक सर्व्हिस टच पॉईंट्स आहेत, असं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
7 / 7
याशिवाय काही वेळा इंधनात होणाऱ्या भेसळीमुळे इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हे नवं पॅकेज सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनIndiaभारत