शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ‘या’ कारचे १० लाख युनिट विकले; ३५ किमीची रेंज, भन्नाट फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 10:34 AM

1 / 9
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. या पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून CNG पर्यायाकडे पाहिले जाते. देशातील अनेक कंपन्या आपल्या कार सीएनजी पर्यायात सादर करत आहे.
2 / 9
मारुती सुझुकीच्या कारला देशभरात चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. कंपनीच्या सीएनजी कारला देशात मोठी मागणी आहे. देशात १० लाखांहून जास्त लोकांनी मारुतीच्या सीएनजी कार खरेदी केल्या आहेत. या कारमध्ये ३५ किमी पर्यंत मायलेज मिळते.
3 / 9
देशातील सर्वात मोठी कार मेकर कंपनी मारुती सुझुकीची सीएनजी गाड्यांनी एक नवा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कंपनीने सांगितले की, सीएनजी वाहनांची एकूण विक्रीचा आकडा १० लाख यूनिट्स पार केला आहे.
4 / 9
आता कंपनीकडे खासगी आणि कमर्शियल सेगमेंट मध्ये ९ सीएनजी वाहन आहेत. ज्यात ऑल्टो, एस प्रेसो, वेगनआर, सेलेरियो, डिझायर, अर्टिगा, इको, सुपर कॅरी आणि टूर एसचा समावेश आहे.
5 / 9
मारुतीच्या सी-एनजी गाड्यात ग्राहकांना जबरदस्त मायलेज ऑफर केले जाते. सर्वात जास्त मायलेज Maruti Celerio चे आहे. जे सीएनजी सोबत ३५.६० किमी प्रति किलोचे फ्यूल एफिशिएन्सी ऑफर करते.
6 / 9
याच प्रमाणे Maruti Wagonr, Alto, S-Presso आणि Dzire सुद्धा मागे नाहीत. कंपनीच्या माहितीनुसार यात अनुक्रमे, 34.05 KM, 31.59 KM, 31.20 KM आणि 31.12 KM प्रति किलोचे फ्यूल एफिशियन्सी मिळते.
7 / 9
या कारच्या फीचर्समध्ये मायक्रोस्विच, जे सुनिश्चित करते की वाहन बंद आहे. इंधन भरताना वेळ सुरू होत नाही. गॅस रिसिव्ह स्थितीत याचा अडवॉन्स्ड ड्युअल सोलेनाइड सिस्टम फ्यूलला ऑटो कट करते. सीएनजी फिलर फिल्टर सीएनजी सिस्टमला जंग आणि धुळांपासून बचाव करते.
8 / 9
या कारमध्ये पेट्रोल मोड मध्ये स्टार्ट केले जावू शकते. ज्यावरून इंजिनचे चांगले लूब्रिकेशन होते. ऑटो चेंज - ओव्हर स्विच तात्काळ सीएनजी आणि पेट्रोल मोड दरम्यान स्विच करते.
9 / 9
याचे स्पेशल नोजल वेग आणि सुरक्षित सीएनजी इंधन भरण्यास मदत करते. फ्यूल लेवल जाणून घेण्यासाठी यात खास इंडिकेटर दिले आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी