शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki: मारुती सुझुकीच्या 'या' चार कार्सचा धमाका; कंपनीला मिळाल्या 2.40 लाख बुकिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 5:51 PM

1 / 7
Maruti Suzuki Car Bookings: भारतातील अग्रगण्य कार कंपन्यांपैकी असलेल्या मारुती सुझुकीने भारतीय बाजारावर आपली पकड मजबूत करण्यासाठी उत्पादनाच्या बाबतीत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2 / 7
कंपनीने आता आपले उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी कंपनीने नवीन बलेनो, ब्रेझा, अल्टो के10 आणि सेलेरियो लॉन्च केली आहे. आता कंपनी लवकरच नवीन ग्रँड विटारा एसयूव्हीच्या किमतीबाबत घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
3 / 7
यासोबतच मारुती 2023 मध्ये बलेनो बेस्ड क्रॉसओव्हर आणि 5-डोअर जिम्नीदेखील लॉन्च करणार आहे. सध्या भारतात कंपनीची विक्री 50 टक्क्यावरुन 40 टक्क्यावर आली आहे.
4 / 7
आता कंपनी या नवीन गाड्यांमधून भारतीय बाजारात कमी झालेली आपली प्रतिष्ठा मिळवणे आणि विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच कंपनी आता नव-नवीन गाड्या लॉन्च करत आहे.
5 / 7
सध्या मारुतीच्या ब्रेझा आणि ग्रँड विटाराला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. या दोन्ही एसयूव्हीसाठी कंपनीने 25,000 कोटी रुपयांची बुकिंग मिळवली आहे. फक्त SUV च नाही, Maruti Suzuki ची थ्री-रो UVs, ज्यात Ertiga आणि XL6 सामील आहेत, यांनादेखील ग्राहकांची पसंती मिळत आहे.
6 / 7
या दोन्ही मॉडेलचे कंपनीला 1 लाख बुकिंग मिळाले आहेत. दुसरीकडे, नवीन ब्रेझा आणि ग्रँड विटारासाठी 1.4 लाखांपेक्षा जास्त बुकिंग आहेत. म्हणजेच, Ertiga, XL6, Brezza आणि Grand Vitaraची एकूण 2.4 लाखांपेक्षा जास्त बुकिंग झाले आहेत.
7 / 7
मारुतीने यापूर्वीच नवीन ब्रेझाचे सूमारे 45,000 यूनिट्स डिलिव्हर केले आहेत, तर ग्रँड विटाराची डिलिव्हरी अद्याप सुरू झालेली नाही. कंपनी 26 सप्टेंबर 2022 पासून या नवीन ग्रँड विटाराची किंमत आणि डिलिव्हरीची घोषणा करणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीच्या हाय लेव्हल व्हेरिएंटसाठी सर्वाधिक बुकिंग मिळाले आहे.
टॅग्स :AutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकी