1 / 7नवी दिल्ली : मारुती सुझुकी नेक्सा हे कंपनीचे प्रीमियम रिटेल नेटवर्क आहे. या डीलरशिपद्वारे तुम्हाला मारुतीच्या कार खरेदीवर चांगली सूट मिळू शकते. सवलतीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस सारखे फायदे समाविष्ट आहेत, जे नवीन कार खरेदीवर दिले जात आहेत. ग्राहक या ऑफर अंतर्गत मारुती इग्निस, बलेनो, फ्रोंक्स, सियाझ, जिम्नी सारख्या कारच्या खरेदीवर बचत करू शकतात.2 / 7दरम्यान, ही डिस्काउंट ऑफर फक्त मे 2024 साठी वैध आहे. याशिवाय, व्हेरिएंट, डीलरशिप आणि स्थानानुसार डिस्काउंट ऑफरमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहकांना Nexa शोरूमला भेट द्यावी लागेल. याचबरोबर, मारुती नेक्सा कारवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल जाणून घ्या…3 / 7इग्निसच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे. म्हणजेच एकूण 53 हजार रुपयांची बचत होऊ शकते. तसेच, ऑटोमॅटिक मॉडेल्सवर एकूण 58 हजार रुपयांची बचत होऊ शकते. यामध्ये 40 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 3000 रुपयांचे कॉर्पोरेट बेनिफिट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.4 / 7मारुती सुझुकी टर्बो मॉडेल्सवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 7,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. याशिवाय, खरेदीदारांना 43000 रुपयांच्या ॲक्सेसरीजही मिळू शकतात. म्हणजे एकूण 75 हजार रुपयांची बचत होऊ शकते. नॉन-टर्बो फ्रोंक्स मॉडेल्सवर 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.5 / 72024 मध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या मारुती सुझुकी जिम्नी मॉडेल्सवर 50,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. तसेच, 2023 च्या मॉडेल्सवर 1.50 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.6 / 7विटाराच्या माइल्ड हायब्रिड मॉडेल्सवर एकूण 59000 रुपयांची ऑफर मिळत आहे. यामध्ये 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. याचबरोबर, ग्रँड विटाराच्या स्ट्राँग हायब्रीड व्हेरिएंटवर जवळपास 74000 रुपयांचा फायदा आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.7 / 7बलेनोच्या ऑटोमॅटिक मॉडेल्सवर एकूण 50 हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. यामध्ये 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचे कॉर्पोरेट बेनिफिट यांचा समावेश आहे. मॅन्युअल बलेनोवर एकूण 45 हजार रुपयांची बचत होऊ शकते. यामध्ये 25000 रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बेनिफिट ऑटोमेटिक मॉडेलसारखेच आहेत.