शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Nexa June 2022 Offer: मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट, जूनमध्ये कंपनीनं आणली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 9:10 PM

1 / 8
Maruti Nexa June 2022 Offer: जर तुम्ही या महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या नेक्सा (Nexa) रेंजमधील काही कारवर मोठ्या ऑफर आणल्या आहेत. जून महिन्यात मारुतीच्या काही वाहनांवर 37,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
2 / 8
अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात कार खरेदी करणार असाल तर तुम्ही या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. सध्या तुम्ही कार घेण्याचा विचार केला असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्यायही ठरू शकतो. तर जाणून घेऊया कंपनी कोणत्या कार्सवर देतेय कोणती ऑफर.
3 / 8
Discount on Maruti Ignis: मारुती इग्निस ही नेक्सा श्रेणीतील सर्वात परवडणारी कार आहे. क्रॉसओवर हॅचबॅक मारुती इग्निसवर या महिन्यात 23 हजार रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारावर उपलब्ध आहे.
4 / 8
याशिवाय या कारवर 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंजवर 10,000 रुपयांचा बोनस देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे, कंपनी इग्निसवर एकूण 37 हजार रुपयांची सूट देत आहे.
5 / 8
Discount on Maruti Ciaz: मारुतीच्या आलिशान सेडान सियाझवर कंपनीकडून कोणतीही रोख सवलत देण्यात येत नाही. पण या कारवर एक्सचेंज ऑफर नक्कीच आहे. जर तुम्ही ही कार एक्सचेंज ऑफरमध्ये घेतली तर, तुम्हाला 25 हजार रुपयांचा बोनस मिळेल. याशिवाय जून महिन्यात या कारवर पाच हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे.
6 / 8
Discount on S-Cross: मारुती सुझुकीच्या S-Cross वर या महिन्यात रोख सवलत ऑफर उपलब्ध आहे. जून महिन्यात या कारवर 12 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. तसेच, त्याच्या एक्सचेंजवर 25 हजार रुपयांचा बोनस आहे.
7 / 8
याशिवाय एस-क्रॉसवर पाच हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत एस-क्रॉस भारतीय बाजारपेठेत बंद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी कंपनी नवीन मॉडेल लाँच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
8 / 8
Discount on Maruti Baleno: मारुती बलेनोवर सध्या कोणतीही सूट उपलब्ध नाही. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला मारुती बलेनो अपडेट केली होती. यामुळेच यावर सध्या कोणत्याही प्रकारची ऑफर उपलब्ध नसावी. त्याशिवाय मारुती XL6 वर या महिन्यात कोणतीही ऑफर नाही.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत