शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki: मारुती सुझुकीच्या या कारच्या एअरबॅग सदोष, कंपनीने परत बोलावल्या कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 3:59 PM

1 / 6
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने हॅचबॅक मॉडेल टूरएसच्या १६६ युनिटला रिकॉल केले आहे. या कारच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये काही उणिवा असल्याचा कंपनीला संशय आहे. कंपनीने ज्या कार परत बोलावल्या आहेत. त्यांचे उत्पादन ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्टदरम्यान झाले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना आवाहन करताना सांगितले की, जोपर्यंत हे दोष दूर होत नाहीत, तोपर्यंत या कार चालवू नयेत.
2 / 6
मारुती सुझुकीने शेअर बाजाराला सांगितले की, या कारच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये काही त्रुटी असल्याचा संशय आहे. असे प्रकार अपवादात्मक परिस्थितीत होऊ शकतात. मात्र त्यामुळे वेळेवर एअरबॅग न उघडण्याचा प्रकार घडू शकतो. ज्या कारबाबत संशय आहे, त्या कारच्या ग्राहकांनी फॉल्टी एअरबॅग कंट्रोल युनिटला रिप्लेस केले जात नाही, तोपर्यंत त्यांनी या कार चालवू नयेत, असा सल्ला कंपनीने दिला आहे.
3 / 6
कंपनीने सांगितले की, मारुती सुझुकीचे अधिकृत वर्कशॉप ग्राहकांशी संपर्क साधतील आणि त्यांच्या कारच्या एअरबॅग कंट्रोल युनिटला रिप्लेस करतील. ग्राहक मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या कारमध्ये काही तांत्रिक दोष आहे की नाही, याची पडताळणी करून घेऊ शकतील. त्यासाठी ग्राहकांना साईटवर कस्टमर इन्फो सेक्शनमध्ये जावं लागेल. तिथे चेसिस नंबर टाकून ग्राहक तपासणी करू शकतात. चेसिस नंबर कारच्या आयडी प्लेटवर लिहिलेला असतो. त्याशिवाय वाहनाचा इनव्हाईस आणि रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांवरही चेसिस नंबरचा उल्लेख असतो.
4 / 6

5 / 6
मारुती सुजुकीची डिझायर टूरएस अनेक शानदार फिचर्स असलेली कार आहे. कंपनीने यामध्ये स्पीड लिमिटिंग फंक्शन, एक्स्ट्रा ड्रायव्हिंग कंफर्ट, ड्रायव्हर साइड एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सारखे फिचर दिले आहेत. फ्लीससोबत येणारी ही कार पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १९.९५ किमी आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये २६.५५ किमी मायलेज देते.
6 / 6
या कारची लांबी ३९९५ एमएम, रुंदी १६९५ एमएम आणि उंची १५५५ एमएम आहे. याचा व्हिलबेस २४३० एमएम आहे. इंजिनाचा विचार केल्यास कंपनी यामध्ये १११९७ सीसी व्हीव्हीटी इंजिन देते. या कारचया पेट्रोल व्हेरिएंटच्या टाकीची क्षमता ४२ लीटर आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन