By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:26 IST
1 / 7देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात अणुबॉम्बच फोडणार आहे. एकामागोमाग एक आशा एक दोन नाही तर पाच एसयुव्ही लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे कॉम्पॅक्ट एसयुव्ही, एसयुव्ही सेगमेंटमध्ये बादशाह असलेल्या टाटा मोटर्स, महिंद्राची पुरती धांदल उडणार आहे. 2 / 7मारुती सुझकी येत्या तीन वर्षांत 5 एसयुव्ही लाँच करणार असल्याचे पक्के झाले आहे. यापैकी काही एसयुव्ही या टोयोटासोबत मिळून तयार केल्या जाणार आहेत. ऑटोकार इंडियाने एका वृत्तामध्ये या पाचही एसयुव्हींची कोडनेमसह कंफर्म लिस्ट प्रसिद्ध केली आहे. कोणत्या कार असणार यावर टाकुया एक नजर...3 / 7मारुती सुझुकी जिम्नी येणार असल्याचे वृत्त गेल्या दोन वर्षांपासून येत आहे. आता कुठे कंपनीने भारतात लाँच करण्याची परवानगी दिली आहे. भारतात या कारचे 5 दरवाज्यांचे मॉडेल लाँच केले जाईल.4 / 7ही कंपनीचा सर्वात पसंतीची आणि सर्वात सुरक्षित (मारुतीच्या कारमध्ये) कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. फोर्डच्या इकोस्पोर्टने सुरुवात केली आणि त्यानंतर आलेल्या मारुतीच्या ब्रेझाने बाजी मारली. ही कार मोठ्या काळापासून या सेगमेंटची बॉस आहे. मारुती या कारमध्ये अद्ययावत फिचर्स देणार आहे. 5 / 7बेझाबरोबरच मारुती भारतीय बाजारातील पहिले स्थान बळकट करण्यासाठी आणखी एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही आणणार आहे. या कारला प्रिमिअम कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये म्हणजेच नेक्सामध्ये ठेवण्यात येणार आहे. भारतात या कारची टक्कर किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यूबरोबर होणार आहे. 6 / 7एसयुव्ही सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टॉसची चलती आहे. मारुतीला या सेगमेंटमध्ये उडी मारणे अद्याप जमलेले नाही. यामुळे मारुती या सेगमेंटमध्ये नवी एसयुव्ही आणणार आहे. या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असेल परंतू क्रेटा आणि सेल्टॉससारखे डिझेल इंजिन असणार नाही. 7 / 7मारुतीला आणखी एक न झेपलेला सेगमेंट म्हणजे मोठी एसयुव्ही. मारुतीकडे तीन रो सीट असलेल्या दोन एमपीव्ही आहेत. अर्टागा आणि एक्सएल ६. परंतू मारुतीकडे अशी कार नाहीय जी ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, टोयोटाकडे आहे. प्रमिअम एसयुव्ही. मारुती आता त्या सेगमेंटमध्येही उतरण्यासाठी सात सीटर एसयुव्ही लाँच करणार आहे. कदाचित एक्सएल ६ बंद करून ही एसयुव्ही बाजारात आणली जाईल.