maruti suzuki wagon r 2022 launching soon in india see the latest photo of car
नवीन Maruti WagonR चा लेस्टेस्ट फोटो लीक! उत्तमोत्तम फिचर्स अन् किंमत जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 4:42 PM1 / 9भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली नवीन उत्पादने लॉंच करताना पाहायला मिळत आहेत. यातच या स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीनेही कंबर कसली असून, आक्रमकपणे नवीन उत्पादनांवर काम करत आहे. 2 / 9Maruti Suzuki कंपनी येत्या काही काळात Ertiga, XL6, Alto आणि WagonR चे अपडेटेड व्हर्जनवर काम करीत आहे. याशिवाय, नवीन विटारा ब्रेझा आणि एकदम नवीन मिड साइज एसयूव्ही तयार करत आहे. यापैकी काही कार यावर्षीच्या अखेरीस लॉंच केल्या जाऊ शकतात. 3 / 9Maruti Suzuki WagonR 2022 लवकरच लाँच करण्यात येणार आहे. परंतु, याआधीच याचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. WagonR 2022 अपडेट मॉडलचे टीव्ही कमर्शियल शूट टेस्टिंगदरम्यान स्पाय फोटो समोर आले आहेत.4 / 9Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्ट डिझाइन मध्ये खूप जास्त बदल पाहायला मिळणार नाहीत. अपडेटेड मॉडलमध्ये केवळ ब्लॅक रूफ आणि नवीन ब्लॅक आउट अलॉयड व्हील नवीन दिसत आहेत. मारुती या टॉल बॉय हॅचबॅक मध्ये नवीन कलर ऑप्शन आणू शकते.5 / 9WagonR 2022 एमटी व्हेरियंट आणि इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टम सोबत हिल होल्ड असिस्ट मिळू शकतो. हॅचबॅकला Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट सोबत ७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम सोबत आणले जाणार आहे.6 / 9नवीन WagonR 2022 इंजिन मध्ये सध्या तरी कोणताही बदल पाहायला मिळणार नाही. याला २ पेट्रोल इंजिन १.० लीटर आणि १.२ लीटर ४ सिलिंडर सोबत आणले जाईल. १.० लीटर इंजिन 68bhp ची पॉवर आणि 90Nm चे टॉर्क जनरेट करते. 7 / 9WagonR 2022 १.२ लीटर इंजिन 83bhp च्या पॉवर सोबत येते. याच्या ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्सचा समावेश आहे. फेसलिफ्टला नवीन सीट मिळण्याची शक्यता आहे.8 / 9या कारच्या लाँचिंग आधीच या कारचा एक फोटो समोर आला आहे. यामुळे ग्राहकांमधील उत्सुकता वाढल्याचे सांगितले जात आहे. देशात ग्राहकांची पसंतीची कार म्हणून वेगनआरची ओळख आहे. जानेवारी २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री Maruti Suzuki WagonR ची झालेली आहे. 9 / 9गेल्या अनेक वर्षांपासून Maruti Suzuki देशातील पहिल्या क्रमांकाची कार विक्री करणारी कंपनी ठरत आहे. मारुतीच्या कारची १ ते सव्वा लाख युनिटची प्रति महिना विक्री होताना पाहायला मिळत आहे. स्वदेशी असो किंवा विदेशी, मारुतीच्या आसपासही कोणती कंपनी नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications